BMC Election: बोगस मतदारांवर शिंदे गटाचीही नजर! वोटर लिस्टबाबत खास खबरदारी, ‘लक्षवेध ॲप’द्वारे नवी रणनिती

BMC Elections 2025: विभाग समन्वयक आणि शाखा समन्वयक अशा नियुक्त्या करून पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पाटील, प्रतिनिधी:

BMC Elections 2025: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मतदार याद्यांबाबत सजग झाली आहे. विरोधकांकडून मतदार पडताळणी सुरू झाल्यानंतर, शिंदेच्या शिवसेनेने ‘लक्षवेध ॲप'च्या माध्यमातून मतदार पडताळणीची व्यापक मोहीम सुरू केली आहे.या ॲपच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरांत जाऊन मतदारांची माहिती गोळा करून तिची पडताळणी करत आहेत.

मतदार यादीतील चुका दुरुस्त करून अचूक माहिती पक्षाकडे राहावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले असून, प्रत्येक मतदाराशी थेट संपर्क साधून पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संघटनात्मक पातळीवरही शिवसेनेत मोठी हालचाल सुरू आहे. विभाग समन्वयक आणि शाखा समन्वयक अशा नियुक्त्या करून पक्षातील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी केली जात आहे.

Bihar Election : 'PM मोदी मतांसाठी स्टेजवर नाचूही शकतात...'; बिहार निवडणुकीत राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य

तसेच, प्रत्येक प्रभागात जास्तीत जास्त गटप्रमुख नेमण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना देण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे २५०० ते ३००० गटप्रमुखांच्या नेमणुका पूर्ण झाल्या असून, एकूण १० ते १२ हजार गटप्रमुख नेमण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामागील उद्देश म्हणजे प्रत्येक विभागात मजबूत संघटन तयार करून आगामी निवडणुकांसाठी तयारी करणे. मुंबईतील कोणत्या प्रभागात पक्षाचे वर्चस्व आहे आणि कोणत्या ठिकाणी संघटन कमी आहे, हे लक्षात घेऊन सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी विभाग प्रमुख आणि स्थानिक नेत्यांना सोपवण्यात आली आहे.

 नक्की वाचा : Bihar Election: पोलिंग बूथवर फक्त 1200 मतदार; मोबाईल नेता येणार, बिहार निवडणुकीत पहिल्यांदाच 10 ऐतिहासिक बदल