फक्त दोनचं मतं? मनसे उमेदवाराचे धक्कादायक आरोप; अखेर वस्तुस्थिती आली समोर

दहिसर विधानसभा मतदारसंघात (Dahisar Assembly Constituency) मनसेचे उमेदवार राजेश येरुंकर यांनी (MNS candidate Rajesh Yerunkar) ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
दहिसर:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता ईव्हीएमवर सवाल उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या विजयामागे ईव्हीएमला जबाबदार धरलं आहे. खासदार संजय राऊत यांनी अनेक मतदारसंघात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याचा हवाला देत पुन्हा निवडणुकीची मागणी केली आहे. दुसरीकडे 153 -  दहिसर विधानसभा मतदारसंघात (Dahisar Assembly Constituency) मनसेचे उमेदवार राजेश येरुंकर यांनी (MNS candidate Rajesh Yerunkar) ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. 

नक्की वाचा - 'ट्रम्पेट'चा गोंधळ कायम, निवडणूक चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवारांचे 7 आमदार पराभूत

येरुंकर यांनी आरोप केला आहे की, विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात अनेक ठिकाणी मतं देऊनही ईव्हीएममध्ये मोजणी झालेली नाही. मनसे उमेदवार राजेश येरुंकर यांना 5456 मतं मिळाली आहेत. मात्र ते ज्या भागात राहतात त्या बुथवर त्यांना केवळ दोन मतं मिळाली आहेत. यावरुन येरुंकर यांनी तीन सवाल उपस्थित केले आहेत.  

पहिला प्रश्न - ईव्हीएम मशीनला तीन सील असतात. दुसरे म्हणजे, मशीनचे चार्जिंग तपासले असता, काही मशीन 99 टक्के, काही 70 टक्के आणि काही 60 टक्केच चार्ज होत होत्या. इतके दिवस मशीन चालू असताना चार्जिंग 99 टक्के कसं राहू शकतं? हा देखील एक प्रश्न आहे. ते पुढे म्हणाले, मी इथला स्थानिक निवासी आहे. माझ्या घरात चार मतं आहेत. मी, माझी पत्नी, माझी मुलगी आणि माझी आई. येथून मला केवळ दोन मतं मिळाली आहेत. असं कसं होऊ शकतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. माझ्याच घरातले मला मतं देणार नाही का? माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मतं कुठे गेली? त्यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नाबद्दल पालिकेकडून उत्तर देण्यात आलं आहे. बीएमसीने यासंदर्भात ट्विट करीत सविस्तर माहिती दिली आहे. 

नक्की वाचा - ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा फुटणार? सत्तास्थापनेनंतर महायुती 'करेक्ट कार्यक्रम' करणार

पालिकेकडून स्पष्टीकरण...
17 सी आणि ईव्हीएम संयंत्र यातील मतदानाची आकडेवारी आणि संयंत्राचा क्रमांक न जुळणे; मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिटची ९९ टक्के बॅटरी; carrying case सील; उमेदवारातील कुटुंब संख्या आणि त्या तुलनेत सदर उमेदवाराला फक्त दोन मते मिळाले असल्याची तक्रार इत्यादी आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. त्याबाबत पुढीलप्रमाणे वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येत आहे.

Advertisement

१७ सी आणि ईव्हीएम संयंत्र यामधील एकूण मतदानाची आकडेवारी तसेच मशीनचा क्रमांक तंतोतंत जुळत आहे.  17 सी ची एक प्रत मतदानाच्या दिवशी सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींना देण्यात आलेली आहे. तसेच मतदान दिवस / 17A छाननी/मतमोजणी दिवशी कोणतीही लेखी तक्रार दहिसर विधानसभा मतदारसंघ येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही.

माननीय भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या FAQ क्रमांक 34 मध्ये, कंट्रोल युनिटमध्ये तर दिसणाऱ्या ९९ टक्के बॅटरीबाबतची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे आहे. 

Advertisement

मतदानाच्या दिवशी ईव्हीएममधील चार्जिंग 99 टक्के का दाखवलं जातं?

EVM पॉवर पॅक 2000 मतांसह 1 CU सह 4 BU ला सपोर्ट करण्यासाठी डिझाइन केलं आहे. जेव्हा क्षमता जास्त असते तेव्हा व्होल्टेज खूप हळूहळू कमी होतं. परंतु जेव्हा बॅटरीची क्षमता थ्रेशोल्डच्या खाली कमी होते तेव्हा ते वेगानं घसरते. सिंगल BU आणि 1000 पेक्षा कमी मतदान झाल्यास बॅटरीचा प्रवाह कमी असतो आणि आउटपुट व्होल्टेज 7.4V च्या खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे 99% टक्के बॅटरी दिसू शकते.

Carrying Case ला सील योग्य रीतीने लावण्यात आला होता. तसेच सील उघडल्यानंतर 17 सी आणि ईव्हीएम संयंत्र यावरील मतदानाची आकडेवारी तंतोतंत जुळली आहे.

Advertisement

उमेदवार व त्यांचे कुटुंब यांचा समावेश मतदार यादी भाग क्रमांक १६३ मध्ये असून मतदानाच्या दिवशी येरुंकर यांना प्रत्यक्षात ५३ मते मिळाल्याचे फॉर्म 17-C भाग 2 मध्ये दिसून येते. म्हणजेच सदर केंद्रावर उमेदवाराला फक्त २ मते मिळाले असल्याच्या तक्रारीत कोणतेही तथ्य नाही. संबंधित आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही.