BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आता बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपकडून महापौरपदासाठी रितू तावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदी संजय गाडी यांना संधी देण्यात आली आहे. ११ तारखेला महापौरपदासाठी निवडणूक होणार आहे, मात्र तत्पुर्वी ठाकरे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापौरपदासाठी ठाकरे गट उमेदवार देणार नसल्याचे सूचक संकेत माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.
आम्हाला आकड्यांची गणिते मान्य..
"आम्हाला आकड्यांची गणिते मान्य असतात आणि ती मान्य केलेली आहेत. अखेर भाजपला मराठी माणूस हिंदू आहे हे मान्य करावं लागले. आता भाजपने मराठी महापौर दिला आहे, त्यामुळे नक्की आम्ही अपशकुन करणार नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आहोत. कुठल्याही अमिषाला आणि दबावाला बळी न पडता आम्ही तिथे प्रश्न मांडू. भाजपने मराठी महापौर दिला आहे त्यामुळे आम्ही पूढे जाणार नाही," असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
नक्की वाचा: Ritu Tawde Mumbai Mayor Candidate: मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडेंची संपत्ती आणि शिक्षण किती?
"२०२२ मध्ये जी लढाई सुरू होती. त्या संघर्षातही बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेले मराठी माणसाचे झाड ताठ मानेने उभे आहे. बाळासाहेबांच्या नावावर मिळालेला जनादेश कोण कशासाठी वापरतंय? हे जनता बघत आहे. आमची लढाई ही नेहमीच मराठी माणसाच्या अस्मितेसाठी होती आणि ती कायम राहील, असे म्हणत किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला.
माझा विजय निश्चित... रितू तावडे:
दरम्यान, "आम्हाला खात्री आहे 11 तारखेला निवडणुकीत माझा विजय निश्चित होईल. 44 वर्षानंतर भाजपचा सत्ता महापालिकामध्ये आली आहे . विरोधकांचे 50च्यावर नगरसेवक निवडून आले नाहीत. त्यांचा 25 वर्षाचा भ्रष्टाचाराचा कारभार आम्ही मोडून टाकणार आहे. सभागृहात सर्व नगरसेवक हे मुंबईच्या विकासासाठी सेवेसाठी एकत्र येतात त्या मुद्द्यांवर चर्चा करू, मुंबईमध्ये वेगळा बदल मुंबईकरांना पाहायला मिळेल," असं विश्वास रितू तावडे यांनी व्यक्त केला आहे.
Sangli Election 2026: मतदानावर बहिष्कार, अख्ख गाव बंद; एकही मतदान नाही, सांगलीत काय घडतंय?