जाहिरात

Ritu Tawde Mumbai Mayor Candidate: मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडेंची संपत्ती आणि शिक्षण किती?

BJP Mayor Candidate Ritu Tawde: रितू तावडे या यापूर्वीही भाजपतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी आहेत.

Ritu Tawde Mumbai Mayor Candidate: मुंबईच्या संभाव्य महापौर रितू तावडेंची संपत्ती आणि शिक्षण किती?
BJP Mayor In BMC: 44 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई:

BMC Election 2026 BJP Mayor: मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपतर्फे रितू तावडे यांनी अर्ज दाखल केला आहे. उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या संजय घाडी यांनी अर्ज दाखल केला आहे. शिवसेना आणि भाजपचे मुंबई महापालिकेतील संख्याबळ पाहाता महापौर हा भाजपचा आणि उपमहापौर हा शिवसेनेचा होईल अशी शक्यता आहे. मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव झाले होते.  

नक्की वाचा: BMC Mayor: मुंबईच्या महापौर ठरल्या! भाजपकडून उमेदवाराची घोषणा; शिवसेनेचा उपमहापौर

कोण आहेत रितू तावडे ?

रितू तावडे या यापूर्वीही भाजपतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्या भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक असून दुसऱ्यांदा त्या नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या आहेत.  2012 साली रितू तावडे या प्रभाग क्र.121 मधून निवडून आल्या होत्या तर 2025 साली त्या प्रभाग क्र.132 मधून निवडून आल्या.

रितू तावडे यांचे शिक्षण किती ?

53 वर्षांच्या रितू तावडे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये नमूद केलं आहे की त्यांचे शिक्षण 12वी पर्यंत झाले आहे. 1993 साली आचार्य मराठे कॉलेजमधून त्यांनी बारावी पूर्ण केली होती.  विद्याविहारच्या रहिवासी असलेल्या रितू तावडे या व्यापारामध्ये असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

रितू तावडे यांच्या कुटुंबाकडे किती संपत्ती आहे ?

रितू तावडे यांच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीबद्दलही प्रतिज्ञापत्रात माहिती देण्यात आली आहे. तावडे कुटुंबाकडे एकूण 5 कोटी 26 लाख 67 हजार 417 रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये 2 कोटी 82 लाख 42 हजार 417 रुपयांची जंगम मालमत्ता आणि 2 कोटी 44 लाख 25 हजार रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. तावडे कुटुंबावर सार्वजनिक आणि शासकीय वित्तीय संस्थांचे मिळून एकूण 3 कोटी 2 लाख 11 हजार 958 रुपयांचे कर्ज आहे असे शपथपत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारण 14 लाख 71 हजार 870 रुपये इतके आहे.

नक्की वाचा: मुंबईकरांचा खोळंबा! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, कधी अन् कुठे? डिटेल्स वाचून घराबाहेर पडा

रितू तावडे यांच्याकडे आहे फॉर्च्युनर कार

रितू तावडे यांची एकूण जंगम मालमत्ता ही 1 कोटी 82 लाखांच्या घरात आहे. रितू तावडे यांच्याकडे टोयोचा फॉर्च्युनर कार आहे. या कारची किंमत 46 लाख 50 हजारांच्या घरात आहे. त्या हंडे i20 स्पोर्ट्स कारच्याही मालकीण असून या कारची किंमत 6 लाख 43 हजारांच्या घरात आहे. त्यांच्याकडे अक Activa स्कूटरही असून या स्कूटरची किंमत 90 हजारांच्या घरात आहे.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com