धक्कादायक! पोलीस भरती प्रक्रियेतील उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन?

बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले.

Advertisement
Read Time: 2 mins

स्वानंद पाटील, बीड

बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेसाठी आलेल्या एका उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी इंजेक्शनची बाटली ताब्यात घेतली. अन्न व औषध भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सॅम्पल घेण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. इंजेक्शनचे सॅम्पल मुंबईतील प्रयोग शाळेमध्ये पाठवले जाणार आहे. दरम्यान बीडमध्ये सुरू असलेल्या पोलीस भरती दरम्यान आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. या घटनेमुळे उमेदवारांच्या बॅगेचीही आता कसून तपासणी केली जाणार आहे. 

(नक्की वाचा: इंदापूरमधील 3 कॅफेवर पोलिसांची धाड; आत सुरु असलेला प्रकार पाहून सर्वांनाच धक्का बसला)

बॅगमध्ये आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन

शुक्रवारी (21 जून) भरती प्रक्रिया सुरू होण्याआधी एका उमेदवाराच्या बॅगमध्ये उत्तेजक द्रव्याच्या इंजेक्शनच्या बाटलीसह सिरीज सापडल्याने खळबळ उडाली. या उमेदवाराची प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. तसेच उमेदवाराच्या रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. 

(नक्की वाचा: Nagpur Hit and Run : 9 जणांना चिरडणाऱ्या आरोपीचं सत्य उघड, पोलिसांचा मोठा खुलासा)

का घेतले जाते हे इंजेक्शन?

साधारणतः व्यायाम करताना थकवा येऊ नये, यासाठी मिफेट्रामाईन घटक असलेले टर्मिन नावाचे इंजेक्शन घेतले जाते. उमेदवाराकडे सापडलेले हेच इंजेक्शन असावे असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. दरम्यान प्रयोगशाळेमधून अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिकृतरित्या माहिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा: सांगलीतील 'आदर्श' तलाठ्याचा कारनामा; सातबारा उताऱ्यामुळे फुटलं बिंग)

बीड जिल्हा पोलीस दलातील 170 रिक्त पदांसाठी बुधवारपासून (19 जून) भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी 8 हजार 429 उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. भरती प्रक्रियेमध्ये तरुणांसह तरुणींचाही सहभाग आहे. चालक पदासाठीही तरुणींनी अर्ज केले आहेत. पदांमध्ये पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई व पोलीस शिपाई बँड्समन अशा जागा भरल्या जाणार आहेत.  

Advertisement

Beed Police Bharati 2024 | बीड पोलीस भरतीतील आलेल्या उमेदवाराकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन?