9 days ago

अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर आता बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा झालेले कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यावरही राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे. त्यांच्या शिक्षेच्या स्थगिती अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवसही माणिकराव कोकाटेंमुळे वादळी ठरण्याची शक्यता आहे.

Mar 05, 2025 21:34 (IST)

Live Update शिरुर मारहाण प्रकरण : सतीश भोसले आमचा कार्यकर्ता, सुरेश धस यांची कबुली म्हणाले....

बीड जिल्ह्यातल्या शिरुरमध्ये सतीश भोसले या गुंडाकडून एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. भोसले भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे. सुरेश धस यांनी देखील याबाबत कबुली दिली आहे. 

सोशल मीडियावर आलेले व्हिडिओ मी पाहिली आहे. ही घटना दीड ते दोन वर्ष जुनी आहे.  मुलीच्या छेडछाडीमधून कोणत्यातरी कारखान्यावर ही घटना घडला आहे. या प्रकरणात संबंधित पोलीस स्टेशनला मी फोन केला आहे. कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिसांशी बातचित केली असल्याचं धस यांनी सांगितलं. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, असं स्पष्टीकरण धस यांनी दिलंय. 

Mar 05, 2025 20:11 (IST)

Live Update नवी मुंबई पोलिसांची ड्रग तस्करांवर जोरदार कारवाई, 1300 आफ्रिकन नागरिकांना केले हद्दपार

नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध जोरदार मोहीम राबवली आहे. गेल्या दोन वर्षांत सुमारे 100 आफ्रिकन नागरिकांना अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली आहे, तर 1,300 जणांना हद्दपार केले आहे. मुंबई आणि नवी मुंबई हे अमली पदार्थांचे प्रमुख केंद्र असून, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेतून चरस, हेरॉइन आणि कोकेनची तस्करी होते. शैक्षणिक संस्थांजवळील अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी पोलिसांनी छापे टाकले आहेत. जनजागृतीसाठी शाळा, महाविद्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे. 

महिलांनी आपल्या कुटुंबांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांशी संवाद साधून माहितीची त्वरित चौकशी केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. नवी मुंबई पोलिस अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी म्हटले आहे.

Mar 05, 2025 18:50 (IST)

Live Update : कोकणात ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कोकणातील आणखी एक माजी आमदार पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघातील उबाठाचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाप्रमुख संजय कदम शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे.

शिवसेनेतील एक वरीष्ठ नेता आणि संजय कदम यांची मुंबईत भेट झाल्याची सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संजय कदम यांचा लवकरच मुंबईत पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. संजय कदम विधानसभा निवडणुकीत मंत्री योगेश कदमांकडून पराभूत झाले होते.

यापूर्वी माजी आमदार राजन साळवी, माजी आमदार सुभाष बणेंनी ठाकरेंची साथ सोडली होती. 

Mar 05, 2025 18:14 (IST)

Live Update : लखनौच्या कोर्टानं राहुल गांधीवर लावला 200 रुपयांचा दंड, सुनावणीस हजर राहण्याचे आदेश

उत्तर प्रदेशातील लखनौ न्यायालयानं काँग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर दिलेल्या वक्तव्या प्रकरणात 200 रुपयांचा दंड सुनावला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीस सातत्यानं गैरहज राहिल्यानं अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (ACJM) न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

न्यायालयानं राहुल गांधी यांना 14 एप्रिल 2025 रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचं उल्लंघन केल्यास गांधींवर कठोर कारवाई होऊ शकते. 

Advertisement
Mar 05, 2025 16:58 (IST)

Live Update : राचिन रविंद्रची दमदार सेंच्युरी, न्यूझीलंडचे 200 रन्स पूर्ण

SA vs NZ Live Score: दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची दुसरी सेमी फायनल सुरु आहे. या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा ऑल राऊंडर राचिन रविंद्रनं सेंच्युरी झळकावली आहे. रविंद्रनं 12 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं 93 बॉल्समध्येच सेंच्युरी पूर्ण केली आहे. 

रविंद्रच्या या सेंच्युरीसह न्यूझीलंडनं 200 रन्सचा टप्पा 32 ओव्हर्समध्येच पूर्ण केला आहे. न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू केन विल्यमसननं रविंद्रला भक्कम साथ दिली असून त्यानंही हाफ सेंच्युरी झळकावली आहे. 

Mar 05, 2025 15:46 (IST)

यवतमाळ येथील निकृष्ट पाईपलाईन प्रकरणात, संजय राठोड यांचं स्पष्टीकरण

यवतमाळ येथील निकृष्ट पाईपलाईन प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव आल्यानंतर यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचे हे प्रकरण नाही. अमृत योजनेच्या माध्यमातून यवतमाळमध्ये पाणीपुरवठा योजना झाली. त्यावेळी पाईपलाईन व्यवस्थित टाकल्या गेल्या नव्हत्या. हायकोर्टाने उल्लेख केला पण त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सुनावणी सुरू आहे.

Advertisement
Mar 05, 2025 15:42 (IST)

लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे पैसे 8 मार्चला खात्यात जमा होणार, अदिती तटकरेंची माहिती

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत २ कोटी ५४ लाख महिलांना जानेवारी आणि फेब्रुवारी  महिन्याचा लाभ येत्या ८ मार्चला खात्यात जमा होईल अशी माहिती, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज विधानपरिषदेत दिली. 

Mar 05, 2025 15:41 (IST)

राज्यभरात GBS चे एकूण २२३ रूग्ण

राज्यभरात GBS ची परिस्थिती

राज्यभरात GBS चे एकूण २२३ रूग्ण 

व्हेंटिलेटरवर असणारे एकूण रूग्ण -१४ 

ICU मध्ये असणारे एकूण रूग्ण - २९

राज्यभरात GBS चे एकूण ११ मृत्यू त्यातून ६ मृत्यू हे GBS ने झाले असून ५ मृत्यू हे संशयित आहेत 

आतापर्यंत एकूण १७४ जणांना डिस्चार्ज झाला

Advertisement
Mar 05, 2025 13:11 (IST)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, नाशिक सत्र न्यायालयाकडून शिक्षेला स्थगिती

Mar 05, 2025 12:20 (IST)

माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग आणणार : जयकुमार गोरे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा गु्न्हा दाखल झाला होता. 2019 ला न्यायालयाने या प्रकरणात मला निर्दोष मुक्त केलं आहे. मात्र सहा वर्षांनी हा विषय समोर आणला आहे. माझ्याविरोधात झालेल्या आरोपांची चौकशी करावी. माझ्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात हक्कभंग आणणार, असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. 

Mar 05, 2025 12:17 (IST)

अबू आझमींवर कारवाई, प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरला का सोडता? अंबादास दानवेंचा सवाल

अबू आझमी याला उचलून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं.  मात्र प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांना का सोडता? अंबादास दानवे यांचा सवाल. कोरटकरचा मोबाईल जप्त होतो पण तो सापडत नाही. अबू आझमीवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. आता उचलून त्यांना थेट जेलमध्ये टाका,  अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.  

Mar 05, 2025 12:08 (IST)

महापुरुषांच्या अवमान करणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक

महापुरुषांच्या अवमान करणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक

कोरटकर असेल किंवा कुणी असो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विषयी कोणीही जर अपमानजनक बोलणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही.  जरी कोर्टाने काही निर्णय दिला असला तरी आपण वरच्या कोर्टात जाऊ.

Mar 05, 2025 10:59 (IST)

महापुरुषांच्या अपमानावरुन विरोधक आक्रमक

महापुरुषांच्या अपमानावरुन विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या पायऱ्यावंर महाविकास आघाडीचं आंदोलन, महायुतीचे आमदार अमोल मिटकरी देखील आंदोलनात सहभागी

Mar 05, 2025 10:54 (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गुलाबराव पाटील यांनाही दणका


अमृत जल योजना घोटाळा संदर्भात गुलाबराव पाटील यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुलाबराव पाटील यांच्या खात्यासाठी अद्याप पीएपीएस आणि ओसडींची नेमणूक करण्यात आलेली नाही. गुलाबराव पाटील यांनी सुचवलेली नावं मुख्यमंत्री कार्यालयाकडून रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नवीन नाव सुचवण्याबद्दल गुलाबराव पाटील यांना निरोप दिला होता.

Mar 05, 2025 10:38 (IST)

भगवानगड संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या मागे आहे : नामदेवशास्त्री

नामदेवशास्त्री यांनी म्हटलं की, संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी मला पूर्वकल्पना नव्हती. धनंजय देशमुख ज्यावेळी गडावर आले त्यावेळी त्यांनी मला त्याची जाण करून दिली. धनंजय देशमुख यांनी माझे भेट घेतल्यानंतर माझी भावना बदलली. भगवानगड हा देशमुख कुटुंबाच्या मागे आहे. लोकांनी ही गैरसमज करू नये, निश्चितच मला जाण झाली आहे. न्यायालयाने देखील हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा...

Mar 05, 2025 10:22 (IST)

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली

मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशीम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली 

मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करणे शक्य नसल्यामुळे पालकमंत्रिपद सोडल्याची सूत्रांची माहिती 

वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार 

क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे लवकरच पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती 

मुश्रीफ 26 जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्यात गेलेच नाहीत

Mar 05, 2025 10:02 (IST)

मी काँग्रेसची शिपाई आहे, काँग्रेस पक्षातच राहणार; विजय वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण

मी काँग्रेसची शिपाई आहे. मी माझ्या पक्षातच राहणार आहे. माझ्याबाबत कुणीतर अफवा पसरवत आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे. 

Mar 05, 2025 09:51 (IST)

कोथरूड येथील MIT परिसरात अनधिकृत बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांच्या व्यवसायांवर कारवाई

कोथरूड येथील MIT परिसरात अनधिकृत बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांच्या व्यवसायांवर कारवाई 

नागरिकांनी घुसखोरांकडून खरेदी थांबवावी व आपल्या आसपास घुसखोरांचे व्यवसाय दिसल्यास आम्हाला कळवावे, अशी भूमिका राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी मांडली आहे.

Mar 05, 2025 09:45 (IST)

राजीनामा दिल्याने विषय संपला नाही, धनंजय मुडेंना सहआरोपी करा: रोहित पवार

धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर विषय तिथेच संपतो असं नाही. त्यांना यात सह आरोपी करा, अशी मागणी देखील आम्ही करत आहोत. बीडमध्ये दहा महिन्यात 36 खून झाले आहेत. ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे ते अनेक समाजाचे आहेत, त्यांना देखील न्याय मिळाला पाहिजे. वाल्मीक कराड फोन करून शस्त्र परवाने देण्यासंदर्भात सांगायचा. वाल्मीक कराडविरोधात अनेकांना आवाज उचलायचा आहे. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी वाल्मीकविरोधात पुढाकार घेतला तर अख्खा महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

Mar 05, 2025 08:18 (IST)

Live Update : विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता ?

विरोधी पक्षनेता निवड लांबणीवर पडण्याची शक्यता ? 

विरोधी पक्षनेता निवडीसाठी विधीमंडळाकडून विविध दाखले तपासले जाणार

संसद विधीमंडळ कामकाज  २००६च्या तरतुदी नुसार १० टक्के संख्याबळ आवश्यक

संसदेत आणि  इतर राज्यातील नियमांचा विधीमंडळ घेणार आढावा

विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार

Mar 05, 2025 07:11 (IST)

Live Update : मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची पोलीस कोठडी आज संपणार

मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या तीनही संशयितांची आज पोलीस कोठडी संपणार असून तीनही संशयितांना पोलीस कोठडी संपल्याने जिल्हा सत्र न्यायालयात पोलिसांकडून हजर केले जाणार आहे. छेडछाड प्रकरणात मास्टर माइंड हा कोणी वेगळा असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून संशयितांची पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांकडून न्यायालयाकडे केली जाण्याची शक्यता आहे.