अमोल सराफ, बुलढाणा:
EX MLA Rahul Bondre News: काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याविरोधात चिखली येथे गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची दिशाभूल केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच आरोपाखाली चिखली पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले असून त्यांचा शोध सुरु आहे. अशातच चिखली पोलीसांना शोधूनही सापडत नसलेले फरार माजी आमदार राहुल बोंद्रे विधान भवनात मात्र बिनधास्त फिरत असल्याचं समोर आले आहे.
फरार आमदाराचा विधानसभेत वावर
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्याबाबत परमहंस मोनीबाबा शिक्षण संस्था प्रकरणात त्यांच्यासोबत व इतर जणांवर गुन्हे दाखल करून दोन आठवडे उलटून गेले. मात्र अद्यापही यातील आरोपींना पोलीस शोधू शकली नाही. मात्र धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांच्या लेखी फरार असलेले राहुल बोंद्रे हे थेट मुंबईतील विधानभवन परिसरात मुक्तपणे वावरताना दिसून आले आहेत.
विशेष म्हणजे, बुलढाणा पोलिसांना शोधूनही सापडत नसलेले माजी आमदार राहुल बोंद्रे हे विधानभवनाच्या लॉबीत फिरताना चा व्हिडिओ आता व्हायरल होतो आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवण्याकरता करता न्यायालयात धाव घेतील घेतली असल्याचे माहिती मिळत आहे.