जाहिरात

Thane News: ठाण्यात एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांनी भाकरी फिरवली, 'या' निवडणुकीत महायुतीचे 13 उमेदवार विजयी

बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला.

Thane News: ठाण्यात एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाणांनी भाकरी फिरवली, 'या' निवडणुकीत महायुतीचे 13 उमेदवार विजयी
Thane District Cooperative Bank Result Update

Thane Political News Today :  ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पॅनल पद्धतीने झालेल्या निवडणुकीत केंद्रात आणि राज्यात सत्तेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे शिलेदारच एकमेकांविरुद्ध लढत असल्याचे पाहायला मिळाले. अखेर या निवडणुकीत 'परिवर्तन पॅनल'चा पराभव करत 'सहकार पॅनल'ने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.  ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे.बहुजन विकास आघाडीकडून या बँकेतील सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांनी या निवडणुकीत राजकीय चाणक्यनीतीचा अवलंब केला.

आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे उमेदवार

ठाणे जिल्हा मध्यवर्ती निवडणुकीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून शिंदेसेनेच्या काही उमेदवारांसोबतच आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात भाजपचे काही उमेदवार उभे होते. तर त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या 'परिवर्तन पॅनल'मध्येही भाजपचे 4 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 3 उमेदवार उभे होते.दोन्ही पॅनलमध्ये आपले उमेदवार उभे करण्यामागे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्याचे कारण दोन्हीही नेत्यांकडून देण्यात आले होते.  

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याणच्या 'या' भागातील मोबाईल टॉवरला भीषण आग, दाट लोकवस्तीत घडली थरारक घटना, Video व्हायरल

शिंदे-चव्हाणांची राजकीय चाणक्यनीती यशस्वी

नुकत्याच लागलेल्या निकालात भाजपचे 8 तर शिंदेसेनेचे 5 उमेदवार निवडून आले आहेत.एकूण 21 जागांसाठी झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी 11 उमेदवारांची गरज होती.मात्र महायुतीचे 13 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे शिंदे-चव्हाणांची राजकीय चाणक्यनीती यशस्वी ठरल्याचे दिसत आहे.

नक्की वाचा >> Petrol-Diesel : मोठा दिलासा! पेट्रोल-डिझेलबाबत केंद्र सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय, 1 जुलै 2026 पासून..

तर दुसऱ्या बाजूला या निकालातून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे.आता ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सत्तेबाबतचा पुढील निर्णय महायुतीचे वरिष्ठ नेते म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आहेत,अशी चर्चा आहे.ते या बँकेतील सत्तेच्या चाव्या महायुती म्हणून आपल्याकडे ठेवतात की बहुजन विकास आघाडीकडे सुपूर्द करतात हे पाहणे रंजक ठरेल.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com