Buldhana News : बुलढाण्यातील केसगळतीची देशपातळीवर चर्चा, मोदी सरकारकडून दखल; तज्ज्ञ डॉक्टरांची टीम बोलावली!

बुलढाण्यातील गावकऱ्यांच्या टक्कल होण्यामागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

बुलढाण्यातील दहा गावांमध्ये सुरू असलेली केसगळतीली समस्या हा राष्ट्रीय विषय झाला आहे. या गावांमधील नागरिकांचे केस का गळतायेत हे कारण अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे केस गळतीची समस्या कशामुळे होतेय हे शोधण्यासाठी दिल्ली-चेन्नई येथून विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची टिम  बोलवण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गेल्या काही दिवसांपासून आयुर्वेद, युनानी,  होमिओपॅथी, अॅलोपॅथीचे तज्ज्ञ डॉक्टर आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ या विचित्र केस गळती समस्येवर संशोधन करीत आहे. नागरिकांनी घाबरून नये असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. 

बुलढाणा जिल्ह्यतील शेगाव तालुक्यातील अकरा गावामध्ये नागरिकांचे केस गळती होऊन टक्कल पडत असल्याची समस्या निर्माण झाली आहे. 11 जानेवारी रोजी केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार), आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केस गळती बाधीत गावांना भेटी दिल्या.  रुग्णांसोबत संवाद साधला आणि समस्येविषयी जाणून घेतले. ही समस्या पहिल्यांदाच उद्भवला असल्याने त्याच्या मुळाशी जाऊन संशोधन करणं गरजेचं आहे. या  दृष्टिकोनातून केंद्र आणि सरकारच्या आरोग्य विभागातर्फे उपाय योजना सुरू आहेत.

नक्की वाचा - Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे 

घरगुती वापरातील तेल, साबण, शॅम्पू या उत्पादनांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही या उत्पादनांची मुदत बाह्य झाली आहे का याचीही तपासणी करून ते  वापरावे असं आवाहन त्यांनी केले आहे. केस गळती होत असलेल्याच्या  घटनांची वेळीच दखल घेऊन मी तुम्हाला भेटण्यासाठी आणि धीर देण्यासाठी आलो आहे असून केंद्र आणि राज्य सरकारचे आरोग्य विभाग 24 तास तुमच्या सेवेत राहणार आहेत असेही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते  

Advertisement