जाहिरात

Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे 

Arthritis Symptoms And Causes : तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे संधिवातासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. वेळीच व्हा सावध...

Arthritis Symptoms And Causes : तरुणांमध्ये संधिवाताची समस्या वाढण्यामागील ही आहेत गंभीर कारणे 

- डॉ दीपक गौतम, जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक विभागाचे संचालक, मेडिकवर हॉस्पिटल, नवी मुंबई

Arthritis Symptoms And Causes : संधिवात हा प्रामुख्याने वृद्धांमध्ये आढळणारा आजार म्हणून ओळखला जातो. पण हल्ली ही समस्या तरुणांमध्येही पाहायला मिळतेय. शरीराची योग्य देखभाल न केल्यास फार लहान वयातच अनेकांना या आजाराचा सामना करावा लागतोय. यामुळे सांध्यामध्ये जळजळ होणे, वेदना होणे, सूज येणे आणि सांध्यांमधील लवचिकता नष्ट होऊ शकते. या समस्यांमुळे दैनंदिन जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ चालणे, वाकणे किंवा पायऱ्या चढणे यासारख्या क्रिया करणे कठीण ठरू शकते. या समस्या टाळण्यासाठी योग्य वेळेत या आजारावर उपाय करणे आवश्यक आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तरुणाईमधील संधिवाताची लक्षणे

  • सांधेदुखीच्या सामान्य लक्षणांमध्ये सांध्यांमधील संवेदनशीलता, विकृती, सांध्यांमध्ये जळजळ होणे आणि सूज येणे
  • दैनंदिन कामांमधे अडचणी येणे आणि सांध्यांमध्ये वेदना होणे
  • संधिवातादरम्यान उद्भवणारी अन्य लक्षणे म्हणजे थकवा, शारीरिक लवचिकता कमी होते, त्वचेवर पुरळ येतात, ताप येणे, टाळुला खाज सुटणे आणि अनपेक्षित वजन कमी होणे
  • एखाद्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो  

सावधान! आठवणीमुळे नव्हे तर या समस्येमुळे येते उचकी, जाणून घ्या वैज्ञानिक कारण 

(नक्की वाचा: सावधान! आठवणीमुळे नव्हे तर या समस्येमुळे येते उचकी, जाणून घ्या वैज्ञानिक कारण)

तरुण-प्रौढांमध्ये संधिवाताची समस्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार घटक 

  • स्वयंप्रतिकार रोग (Autoimmune Disease): संधिवात, स्पॉन्डिलोआर्थ्रोपॅथी, सोरायसिस इत्यादी स्वयंप्रतिकार रोगांमध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली निरोगी ऊतींवर हल्ला करते, याचा परिणाम सहसा सांधे आणि अवयवांवर होतो. सुरुवातीच्या टप्प्यात यामुळे एक किंवा अनेक सांध्यांवर परिणाम होऊ शकतो.  
  • मुलांमधील संधिवात : लहान मुलांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्यास संधिवाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता नाही.
  • आनुवंशिकता: आनुवंशिकतेमुळेही संधिवाताचा त्रास निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्यामध्ये सांध्यांशी संबंधित आजाराचे निदान झाले असेल तर तारुण्यात संधिवात होण्याचा धोका असतो.
  • लठ्ठपणा : जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे सांधे, गुडघे आणि नितंबांवर अतिरिक्त ताण येतो. अतिरिक्त वजनामुळे हाडांची झीज होऊ लागते. यामुळे सांधेदुखी आणि ऑस्टियोआर्थरायटिस यासारख्या समस्यांची शक्यता वाढू शकते.

Hair Care Tips: केस होतील घनदाट आणि लांबसडक, असा करा तुपाचा वापर

(नक्की वाचा: Hair Care Tips: केस होतील घनदाट आणि लांबसडक, असा करा तुपाचा वापर)

  • दुखापत : हाडांशी संबंधित दुखापत झाल्यास त्याचा परिणाम तुमच्या हाडांवर होऊ शकतो. फ्रॅक्चर आणि लिगामेंट टिअर यासारख्या दुखापतींमुळे भविष्यात संधिवात होण्याचा धोका वाढू शकतो. घसरून पडणे आणि किरकोळ जखमांमुळेही सांध्यांना सूज येणे, सांधेदुखी इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. 
  • बैठी जीवनशैली : एका जागी जास्त वेळ बसून काम करावे लागत असल्यास शारीरिक हालचालींवर मर्यादा येते. शारीरिक हालचालीच्या अभावामुळे स्नायू कमकुवत होऊ लागतात.  
  • आहाराच्या चुकीच्या सवयी: पोषक आहाराच्या कमतरतेमुळे संधिवाताची समस्या निर्माण होऊ शकते. प्रक्रिया केलेले किंवा शर्करायुक्त पदार्थांचे अतिरिक्त सेवन केल्यास तरुणांमध्ये संधिवाताचा धोका वाढू शकतो.  
  • गाऊट (Gout): रुग्णाच्या रक्तामध्ये युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास सांध्यामध्ये तीव्र वेदना होऊ लागते. या आजारात सांध्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे खडे तयार होतात, त्यामुळे या वेदना होऊ लागते.  

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )

Listen to the latest songs, only on JioSaavn.com