Buldhana News: वर्दीचं स्वप्न अधुरं! पोलीस भरतीचा सराव करताना अनर्थ घडला, आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला

तरुणाचा धावण्याचा सराव करताना मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीपक रामदास जाधव असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, बुलढाणा: 

Buldhana News:  राज्यात सध्या पोलीस भरती सुरु आहे. अनेक तरुण- तरुणी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मैदानावर घाम गाळत आहेत. अशातच बुलढाण्यामधून एक काळीज पिळवटणारी घटना समोर आली आहे. बुलढाण्यात भरतीचा सराव करत असताना तरुणाचा छातीत तीव्र वेदना आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

वर्दीचं स्वप्न अधुरं राहिलं...

राज्यात सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेला एका पाठोपाठ एक बसणाऱ्या धक्क्यांमुळे शोककळा पसरली आहे. बीडमधील घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव येथील एका १९ वर्षीय तरुणाचा धावण्याचा सराव करताना मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. दीपक रामदास जाधव असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता.

HSRP Deadline: एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्यासाठीची मुदत काय? यापुढे एकही संधी मिळणार नाही

​मिळालेल्या माहितीनुसार, दीपकची १३ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शारीरिक चाचणी (ग्राउंड टेस्ट) होती. या चाचणीच्या पूर्वतयारीसाठी तो १२ फेब्रुवारी रोजी मंगळूर नवघरे परिसरात सराव करत होता. धावत असताना अचानक त्याला छातीत कळा जाणवू लागल्या आणि तो जागीच कोसळला. उपस्थित मित्रांनी त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. दीपकच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

बीडमध्येही घडली होती घटना.. 

​बीडमध्येही दोन दिवसांपूर्वी १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर दीपक वाव्हळे या तरुणाचा मृत्यू झाला होता. वाढते तापमान आणि शारीरिक ताण यामुळे या घटना घडत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक जिल्ह्यांमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत मैदानी चाचण्या न घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, सरावादरम्यान होणाऱ्या या मृत्यूंमुळे उमेदवारांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा प्रश्न आता गंभीर बनला आहे.

Advertisement

Kalyan News: कल्याणमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! मोस्ट वॉन्टेडला पकडताना पोलिसांवरच झाला हल्ला, पाहा काय घडलं?

Topics mentioned in this article