Maharashtra HSRP Number Plate Deadline: महाराष्ट्रातील सगळ्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) नसलेल्या वाहनांविरोधात येत्या 18 फेब्रुवारीपासून राज्यभर कडक अंमलबजावणी मोहीम सुरू करण्यात येणार आहे. परिवहन आयुक्तांनी या निर्णयाची घोषणा केली असून, वारंवार दिलेली मुदतवाढ आता संपली असल्याचे स्पष्ट केले आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपून आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना या प्लेट्स बसवणे अनिवार्य आहे. मात्र, प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही अनेक वाहनांना अद्यापही HSRP नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही. नंबरप्लेट बसविण्यासाठीची केंद्र कमी असणे, बुकींग करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी अशी असंख्य कारणे यामागे असल्याचे असंख्य वाहनधारकांचे म्हणणे आहे. परिवहन विभागाने मात्र डेडलाईन निश्चित केली असून 18 फेब्रुवारीनंतर ही नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येईल असे कळते आहे.
HSRP नंबरप्लेट कोणत्या गाड्यांना बसविणे आवश्यक
HSRP बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपून आता एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. त्यामुळे आता कोणतीही सवलत न देता थेट रस्त्यावर उतरून तपासणी करण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC)
वैध विमा (Insurance)
पीयूसी (PUC) प्रमाणपत्र
ड्रायव्हिंग लायसन्स (DL)
यांपैकी कोणतेही कागदपत्र अवैध किंवा नसल्यास वाहनचालकांवर दंड लावला जाईल.
1 कोटींहून अधिक वाहने अद्याप HSRP शिवाय
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ही नंबरप्लेट बसविण्यासाठीच्या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील 24,28,589 पात्र वाहनांपैकी केवळ 8,57,209 मालकांनी (फक्त 35 टक्के) आतापर्यंत नोंदणी केली आहे. म्हणजेच अजूनही 65 टक्के वाहने विना-HSRP आहेत. संपूर्ण राज्याचा विचार केला तर 1 कोटीपेक्षा जास्त वाहने अजूनही जुन्याच नंबर प्लेटवर धावत आहेत.
HSRP नंबरप्लेट कशी बसवायची ? जाणून घ्या सगळी प्रोसेस
1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सगळ्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSRP) सक्तीची करण्यात आलेली आहे. ही नंबरप्लेट बसविण्यासाठी खासगी एजन्सींची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना यासाठी ऑनलाइन अॅप्लिकेशन करावे लागते, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक तारीख आणि वेळ दिली जाते जेव्हा तुमची गाडी घेऊन तुम्हाला फिटमेंट सेंटरवर जावं लागतं. बाईक किंवा स्कूटरला ही नंबरप्लेट बसवून घ्यायची असेल तर त्यासाठी 450 रूपये खर्च येतो तर कार असेल तर त्यासाठी 745 रुपये खर्च येतो.
- HSRP नंबरप्लेटसाठी रजिस्ट्रेशन या वेबसाईटवरून करा- https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html
- Apply High Security Registration Plate Online वर ऑफीस सिलेक्ट करा
- APPLY HSRP हा पर्याय निवडा
- Order HSRP यावर क्लिक करा
- गाडीचं Registration Number, चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक, इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक आणि मोबाईल नंबर भरा
- सगळ्यात शेवटी पेमेंटचा पर्याय येईल ते केल्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world