Viral Video: 'तू कोण कलेक्टर आहे का, की होम मिनिस्टर?' महिला कंडक्टर भडकली, ST बसमध्येच राडा

प्रवाशांशी संवाद साधताना संयम राखणे अपेक्षित असताना, अशा प्रकारे उग्र भाषा वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल बस स्थानकावर शेगाव आगाराच्या महिला एसटी वाहकाने प्रवाशांशी वाद निर्माण केला होता
  • बसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असल्याने महिला वाहकाने काही प्रवाशांना खाली उतरवण्यास भाग पाडले होते
  • महिला वाहकाने तू कोण कलेक्टर आहे का, होम मिनिस्टर आहे का, असे प्रश्न विचारत अत्यंत उद्धट वागणूक दाखवली
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बुलढाणा:

अमोल सराफ  

"प्रवाशांच्या सेवेसाठी" हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या एसटी महामंडळाच्या एका महिला वाहकाचा संतापजनक अवतार बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळाला. वरवट बकाल बस थांब्यावर शेगाव आगाराच्या महिला कंडक्टरने प्रवाशांशी चक्क 'तू-तामी' करत हुज्जत घातली. "तू कोण कलेक्टर आहे का, की होम मिनिस्टर?" अशा शब्दांत या महिला वाहकाने प्रवाशांना झापल्याने बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय या महिला कंडक्टरने काही प्रवाशांना एसटी बसमधून खाली ही उतरवले. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव आगाराची बस वरवट बकाल येथून शेगावच्या दिशेने जात होती. यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी चढल्याने महिला वाहक आणि प्रवाशांमध्ये किरकोळ वादावादी सुरू झाली. मात्र, हा वाद लवकरच वाढत गेला. महिला वाहकाने जास्तीच्या प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी प्रवाशांशी त्यांनी अत्यंत उद्धट भाषेत संवाद साधला. यामुळे एसटी बसमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला. काहींनी याचा व्हिडीओ शूट केला. तोच सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा - Unique Wedding: अनोखी वरात! नवरी आली अन् नवरदेवाला घेऊन गेली, विदाईच्या वेळी नवरा ढसाढसा रडला, पाहा Video

या वादादरम्यान महिला वाहकाचा संयम सुटला. तिने प्रवाशांना उद्देशून, "तू कोण कलेक्टर आहे का, होम मिनिस्टर आहे का? मोदी असला तरी मी काय करू?" अशा प्रकारची चिथावणीखोर भाषा वापरली. उपस्थित नागरिक आणि प्रवाशांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. उलट, समजावून सांगणाऱ्यांशीही तिने हुज्जत घातली. एसटी कर्मचाऱ्यांच्या अशा वर्तणुकीमुळे महामंडळाच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. भररस्त्यात प्रवाशांचा अपमान करणाऱ्या या महिला वाहकावर परिवहन विभाग आणि शेगाव आगार प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Trending News: महिलांना आता लोकसभेत आरक्षण मिळणार की नाही? विधेयक फेटाळल्यानंतर पुढे काय होणार?

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना मिळणाऱ्या वागणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बुलढाण्यातील वरवट बकाल बस स्थानकावर शेगाव आगाराच्या एका महिला वाहकाने प्रवाशांशी घातलेली हुज्जत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. "तू कलेक्टर आहे का?" असा सवाल करत या वाहकाने प्रवाशांशी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन संवाद साधला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसटी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रवाशांशी संवाद साधताना संयम राखणे अपेक्षित असताना, अशा प्रकारे उग्र भाषा वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट आहे.