जाहिरात

Unique Wedding: अनोखी वरात! नवरी आली अन् नवरदेवाला घेऊन गेली, विदाईच्या वेळी नवरा ढसाढसा रडला, पाहा Video

पित्याच्या आधारासाठी या जोडप्याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Unique Wedding: अनोखी वरात! नवरी आली अन् नवरदेवाला घेऊन गेली, विदाईच्या वेळी नवरा ढसाढसा रडला, पाहा Video
  • छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातील सुलपगा गावात नवरीने वरात घेऊन नवरदेवाला सासरी नेण्याचा अनोखा विवाह पार पडला
  • देवमुनि एक्का आणि बिलासुस बरवा यांचा मसीही पद्धतीने विवाह झाला
  • नवरीच्या घरच्या आधारासाठी नवरदेवाने लग्नानंतर पत्नीच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला आणि तो भावूक होऊन रडला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

लग्न म्हटलं की नवरा नवरीकडे येतो. मांडवात लग्न लावतो आणि नंतर आपल्या नवरीला घेवून घरी परततो. त्यावेळी नवरी भावूक होते. ही दृष्य आपण प्रत्येक लग्नात पाहातो. पण याच्या अगदी विपरीत दृष्य एका लग्नात दिसून आलं. इथं सर्व काही उलटं होतं. इथं नवरा नाही तर नवरी वरात घेवू आली होती. ती नवऱ्याला घेवून गेली. छत्तीसगडमधील सरगुजा जिल्ह्यात परंपरेला छेद देणारा हा अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. सहसा नवरदेव वरात घेऊन नवरीच्या दारी जातो. पण येथे नवरीने वाजतगाजत वरात आणली आणि चक्क नवरदेवाला सासरी घेऊन गेली. या अनोख्या विवाहाची आणि विशेषतः नवरदेवाच्या 'विदाई'ची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. शिवाय त्याचा व्हिडीओ ही व्हायरल होत आहे. 

आतापर्यंत तुम्ही नवरीची पाठवणी होताना पाहिली असेल, पण छत्तीसगडमध्ये चक्क नवरदेवाची पाठवणी करण्याची वेळ आली. लग्नानंतर सासरी जाताना नवरदेव इतका भावूक झाला की त्याला रडू कोसळले. या 'उलटा' लग्नाची गोष्ट सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सरगुजा जिल्ह्यातील सुलपगा गावातील देवमुनि एक्का आणि बिलासुस बरवा यांचा विवाह मसीही पद्धतीने पार पडला. या लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे 'कन्यादान' झाले नाही. तर मुलाच्या कुटुंबीयांनी 'वरदान' केले. लग्न लागल्यानंतर जेव्हा निरोपाची वेळ आली, तेव्हा नवरदेव आपल्या कुटुंबाला सोडून जाताना ढसाढसा रडला. नवरीने नवरदेवाला आपल्या घरी नेले असून तो आता आयुष्यभर तिथेच राहणार आहे.

नक्की वाचा - Trending News: महिलांना आता लोकसभेत आरक्षण मिळणार की नाही? विधेयक फेटाळल्यानंतर पुढे काय होणार?

देवमुनि ही चार बहिणी असून तिला भाऊ नाही. तिचे वडील मोहन एक्का यांना शेतीकामात आणि वृद्धपकाळात आधाराची गरज होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबांच्या संमतीने बिलासुसने लग्नानंतर पत्नीच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. समाजासाठी हे वेगळे असले तरी, आपल्या कुटुंबासाठी हा निर्णय गरजेचा होता, अशी भावना मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. सुलपगा गावातील देवमुनि एक्का ही नवरी आपल्या घरापासून वरात घेऊन बिलासुस बरवा याच्या घरी पोहोचली. तिथे सर्व विधी आनंदाने पार पडले. मात्र, जेव्हा नवरदेवाला निरोप देण्याची वेळ आली, तेव्हा उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. नवरदेव आपल्या आई-वडिलांना मिठी मारून रडू लागला, जशी एखादी मुलगी सासरी जाताना रडते.

नक्की वाचा - Gym Wear Risks: सावधान! जिमचे कपडे आरोग्यासाठी घातक? कपड्यांमधील रसायनांमुळे गंभीर आजारांचा धोका

देवमुनिच्या घरी भाऊ नसल्यामुळे तिच्या वडिलांनी ही अट ठेवली होती. बिलासुसने देखील आनंदाने घरजावई होण्याचे मान्य केले. "आम्ही आमच्या जावयाला मुलाप्रमाणे सांभाळू", असा विश्वास मुलीच्या वडिलांनी दिला आहे. या लग्नाने जुन्या परंपरांना बगल देत नवा पायंडा पाडला आहे. छत्तीसगडच्या आदिवासी बहुल सरगुजा जिल्ह्यातील या विवाहाची चर्चा सगळीकडेच आहे. सामाजिक परिवर्तनाची नांदी ठरेल असा एक विवाह सोहळा पार पडला आहे. येथील सुलपगा गावात एका तरुणीने स्वतः वरात नेऊन आपल्या जोडीदाराशी लग्न केले आणि त्याला सासरी (आपल्या घरी) घेऊन आली. पित्याच्या आधारासाठी या जोडप्याने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मसीही रितीरिवाजानुसार देवमुनि आणि बिलासुस यांचा विवाह झाला. या सोहळ्यात मुलाच्या पक्षाने मुलाचा हात मुलीच्या हातात देऊन त्याची पाठवणी केली. 

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com