Kolhapur News: 'शिवाजी महाराज नसते तर भारतात पाकिस्तान...', राज्यपाल राधाकृष्णन यांचे मोठे विधान!

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

कोल्हापूर:  'छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज माझे नाव काहीतरी वेगळे असते..', असे मोठे विधान राज्याचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराज नसते तर आज भारतात खूप पाकिस्तानी असते, असेही ते म्हणाले. सातारा येथे झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील   पहिला दीक्षांत समारंभांत ते बोलत होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) पहिला दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, संस्थेचे सचिव विकास देशमुख, उपाध्यक्ष ऍड भगीरथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श ठेऊन जगण्याचे आवाहन केले. 

"जर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान योद्धा या देशात जन्माला आला नसता तर काय झाले असते? आज मी राधाकृष्णन नावाने उभा आहे. माझे नाव कदाचित दुसरे काहीतरी असते. भारतमातेमध्ये खूप पाकिस्तान असतील. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धा होते, ज्यांनी हिंसकांविरुद्ध लढा दिला..' असं राज्यपाल राधाकृष्णन म्हणाले. 

 'आपण इस्लामच्या विरोधात आहोत का? नाही, ते सर्व संपले आहे. आपल्याला एकत्र राहायचे आहे. परंतु, त्याच वेळी, आपण इतिहास त्याच्या खऱ्या अर्थाने लक्षात ठेवला पाहिजे. आपल्याला सत्य जसे आहे तसे माहित असले पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज एकता, बंधुता आणि सामाजिक न्यायासाठी उभे राहिले, असंही राज्यपाल सी पी राधाकृष्णन म्हणाले. 

नक्की वाचा - Sharad Pawar: एकनाथ शिंदेंचे कौतूक करताना शरद पवारांची गुगली, मात्र दिल्लीतलं वातावरण तापलं

दरम्यान, आपण जाती किंवा धर्माच्या आधारे लोकांमध्ये भेदभाव करू शकत नाही. एखाद्याची महानता त्यांच्या कर्मांनी ठरवली जाते, ते ज्या जातीत जन्माला आले आहेत त्यावरून नाही हे आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे. जुन्या शिक्षण पद्धतीची जागा नवीन शिक्षण धोरणाने घेतली आहे, ज्यामुळे विद्यापीठांकडून दिले जाणारे शिक्षण जागतिक मानकांनुसार असेल याची खात्री होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.