Candela Water boats in Mumbai sea: कॅन्डेला कंपनीच्या नवीन तंत्रज्ञानानेयुक्त बोटी लवकरच मुंबईत दाखल होतील. यामुळे मुंबईच्या जलवाहतूक क्षेत्रात नवी क्रांती होईल, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई' या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, मंत्री राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली. (Candela's eco-friendly water transport In Mumbai)
मुंबईच्या जल वाहतुकीत नवी क्रांती:
मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई'च्या स्वप्नपूर्तीकडे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारा भागातील जोडणी अधिक मजबूत होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतूक, किनारा विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढून नवीन रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध होतील.
Thackeray Family Photo: ठाकरे घराण्याच्या वारसदारांनी दिली 'एकजुटी'ची साक्ष, फोटोची तुफान चर्चा...
बोट नेमकी कशी आहे? Know About Candela Water boat
मंत्री राणे यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला सी 8 आणि पी 12 या अत्याधुनिक बोटींचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या बोटी हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून पाण्यावरून ग्लाइड होतात, त्यामुळे त्या वेगवान, ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. लवकरच पी 12 बोट मुंबईत दाखल होणार असून, यामुळे राज्यातील जलवाहतुकीत आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार आहे.
या भेटीदरम्यान कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हसेलकोग तसेच मुख्य व्यवसाय अधिकारी नकुल विराट यांनी कंपनीच्या तांत्रिक नवकल्पना आणि उत्पादन प्रक्रियेची सविस्तर माहिती मंत्री राणे यांना दिली. महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबतही प्राथमिक चर्चा करण्यात आली.
सिडकोकडून सर्वसामान्यांची लुट? घरांच्या किंमतीबाबत माहिती अधिकारात धक्कादायक बाब समोर