मुंबई: राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी हितासाठी "कॅरी ऑन योजना" लागू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन, विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी देण्यासाठी विद्यापीठ पातळीवर एकसमानता ठेवावी, असे आदेश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले आहेत. मात्र या आदेशावरुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नाराजी दर्शवत हा निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र राज्याचे माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटनुसार राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिवांच्या झालेल्या बैठकीमध्ये सरसकट सर्व विद्यार्थ्यांना ‘कॅरी ऑन' म्हणजेच अनुत्तीर्ण असताना पुढील वर्षात प्रवेश देणे या योजने संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. कॅरी ऑन योजना ही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मारक ठरणारी योजना आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिकची संधी देणे हे चूक नाही परंतु असे करत असताना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाशी तडजोड होता कामा नये. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच कॅरी ऑन साठी अनुकूल असणे दुर्दैवी आहे, असे अभाविपने म्हटले आहे.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतीक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
तसेच कॅरी ऑन योजना ही विद्यार्थी हिताची नसून राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच कॅरी ऑन साठी अनुकूल असणे दुर्दैवी आहे. शिक्षणं क्षेत्रात अशी सकारात्मकता दाखवणे म्हणजे विद्यार्थांची खरतर दिशाभूल करणे होय. अभाविप ने या आधी पण कॅरी ऑन संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अभाविप या निर्णयाचा तीव्र निषेध करते, असे मत कोंकण प्रदेश मंत्री राहुल राजोरिआ यांनी व्यक्त केले आहे.