Dhule Cash Case: शिंदेंचा आणखी एक आमदार अडचणीत! 'धुळे कॅश' प्रकरणात कोर्टाचे मोठे आदेश

 धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नागिंद मोरे, धुळे

Dhule  Cash Case Update: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात केलेल्या मारहाणीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. शिंदे गटाच्या आमदारांची दादागिरी सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. सत्तेचा गैरवापर करुन ही गुंडगिरी सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. संजय गायकवाड यांच्या कारनाम्यामुळे चौफेर टीका होत असतानाच आता शिंदेंचा आणखी एक आमदार अडचणीत सापडला आहे. 

Dhule News: धुळ्यातील पैसे प्रकरणात अर्जुन खोतकर दोषी, अंजली दमानियांचे गंभीर आरोप

धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटलांवर खंडणीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करा असे स्पष्ट आदेश धुळे जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे धुळ्यातील गुलमोहर रेस्ट हाऊस रोकड प्रकरणी विधिमंडळ अंदाज समितीचा धुळे दौरा महागात पडणार आहे. 

शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अंदाज समितीचे अध्यक्ष, शिवसेनेचेआमदार अर्जुन खोतकर यामध्ये अडकण्याची चिन्हे आहेत.... धुळे पोलिसांनी याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. त्या विरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी धुळे जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती.

याची सुनावणी होऊन या प्रकरणात अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्यासह अन्य जणांवर खंडणीसह अन्य गंभीर कलमाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश जिल्हा नायलयाने दिले आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी दिली. या आदेशामुळे पोलीस आणि सरकारी प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे..

Advertisement

Dhule News : शासकीय विश्रामगृहात सापडले कोट्यवधी रुपये; अनिल गोटेंचा गंभीर आरोप

Topics mentioned in this article