Akkalkot Crime : विश्व हिंदू परिषदेने अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेत औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी केली आहे. याबाबत 17 तारखेला राज्यभर जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन दिले जाणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. जर सरकारने लवकरात लवकर औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन 'कार सेवा' करतील असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र-गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या राज्यभरात औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन प्रकरण तापलं आहे. दरम्यान सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अक्कलकोटमध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावामध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्या 14 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाईच्या मागणीनंतर सोलापूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहे.
नक्की वाचा - Solapur : रस्त्यावर नग्नावस्थेत मृतदेह, पाठीभर लोखंडी सळईचे चटके; बीड पॅटर्न माळशिरसमध्ये पोहोचला, संतापजनक घटना
अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी गावातील 14 जणांच्या विरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघांमध्ये औरंगजेबचे स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढत असल्याची खंत आमदार कल्याणशेट्टी यांनी विधानसभेत व्यक्त केली होती. सामाजिक सलोखा बिघडवला जात असल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी ही कारवाई केली. यापुढे अशा पद्धतीचे कृत्य करणाऱ्यांच्या विरोधात आणखी कडक कारवाई करणार असल्याचा सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून इशारा देण्यात आला आहे.
औरंगजेबाची समाधी कुठे आहे?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलदाबाद शहरात औरंगजेबाची समाधी आहे. औरंगजेबपासून 24 किलोमीटर अंतरावर ही कबर आहे. औरंगजेबाला शेख जैनुद्दीन दर्गा किंवा तीर्थस्थानाच्या संकुलातील एक कबरीत दफन करण्यात आलं आहे.