
मुंबई: महाराष्ट्र राज्य सरकारने आणि आरोग्य विभागाने अपघातग्रस्तांसाठी सर्वात मोठा अन् महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे अपघातग्रस्तांवर एका लाखांपर्यंतचे कॅशलेस उपचार होणार आहेत तसेच राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचारघेण्यात येतील, असा मोठा निर्णय आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरु आहे. भीषण अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशातच राज्याच्या आरोग्य विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अपघात ग्रस्तांवर आता एक लाख रुपयांचे मोफत उपचार होणार असून त्यासाठी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून एक लाखापर्यंतचे कॅशलेस उपचाराची तरतूद करण्यात आली आहे.
त्याचबरोबर राज्यातील आणि परराज्यातील व्यक्तीचा महाराष्ट्रात अपघात झाल्यास त्याला कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रूग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)
- अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार
- रूग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता व तक्रारीसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार करण्यात येणार.
- दर महिन्याला प्रत्येक रुग्णालयाने आरोग्य शिबिर घेऊन किमान 5 रुग्णांवर कॅशलेस उपचार करणं बंधनकारक
योजनेतील विविध सुधारणांसाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्यात अहवाल सादर करावा लागणार
(नक्की वाचा- Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world