31 डिसेंबरचं सेलिब्रेशन गोव्याच्या किनाऱ्यावर? कोकण अन् दक्षिणेचा प्लानही ऑन; रेल्वेने दिली Good News

डिसेंबर महिन्यात नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनचा प्लान करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Special Train For New Year : डिसेंबर महिन्यात नाताळची सुट्टी आणि नवीन वर्ष सेलिब्रेशनचा प्लान करत असाल. मात्र वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अधिकांश लोक रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र रेल्वेची तिकीट मिळणंही अनेकदा अवघड होतं. यादरम्यान रेल्वेने एक चांगली बातमी दिली आहे. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यान कोकण, गोवा, कर्नाटक, केरळमध्ये फिरण्याचा प्लान करीत असाल तर तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे. 

या तीन महत्त्वाच्या मार्गांवर २२ डब्यांच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. यामध्ये एसी, स्लिपर, जनरल असे तिन्ही प्रकारचे डबे असतील. या नव्या रेल्वेसाठी वेळेत बुकिंग करणं आवश्यक आहे. 

मुंबई सीएसएमटी-करमाळी (०११५१//०११५२) १९ डिसेंबरपासून ५ जानेवारी २०२६ पर्यंत रोज धावणार. सीएसएमटी स्थानकाडून मध्यरात्री १२.२० वाजता सुटेल. त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमाळीला पोहोचेल. 

करमाळी-मुंबई सीएसएमटी (०११५१//०११५२)

दुपारी २.१५ वाजता सुटेल - दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता मुंबईत पोहोचेल. 

थांबे - दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळून, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम

नक्की वाचा - Central Railway: मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! सण, सुट्ट्यांसाठी 14 विशेष ट्रेन; कधी अन् कुठे धावणार? वाचा डिटेल्स

Advertisement


एलटीटी-तिरुवनंतपुरम (साप्ताहिक) 

लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनंतपुरम उत्तर (०११७१//) साप्ताहिक गाडी १८ ते २५ डिसेंबर, १ आणि ८ जानेवारी रोजी एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटेल. 

दुसऱ्या दिवशी रात्री ११.३० वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. कोकण आणि केरळातील ४० हून अधिक थांबे. 

एलटीटी-मंगळुरू (साप्ताहिक)

एलटीटी-मंगळुरू (०११८५// ०११८६)

ही गाडी १६,२३, ३० डिसेबरला धावेल. यासाठी ६ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता एलटीटीहून सुटेल.  दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०५ वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. 

Advertisement

परतीच्या गाड्या १७, २४, ३१ डिसेंबर आणि ७ जानेवारीला दुपारी १ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ६.५० ला एलटीटीला पोहोचेल. 

थांबे - ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल