Central Railway: मध्य रेल्वेचं मोठं गिफ्ट! सण, सुट्ट्यांसाठी 14 विशेष ट्रेन; कधी अन् कुठे धावणार? वाचा डिटेल्स

मध्य रेल्वेने विविध सणांसाठी, उन्हाळी आणि हिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या फायद्यासाठी विविध ठिकाणांदरम्यान  १४ विशेष  गाड्या चालवण्याचे नियोजन  केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Central Railway 14 Special Trains: सण, सुट्टा, उत्सवासाठी गावी जाताना प्रवाशांची चांगलीच धावपळ होते. अनेकदा ट्रेन उपलब्ध नसल्याने खोळंबा होतो अन् नाहक त्रास सहन करावा लागतो. यामुळेच रेल्वेकडून सणासुदीला विशेष गाड्या सोडण्याची मागणी वारंवार होत आहे. याबाबतच आता मध्य रेल्वे प्रशासनाने सर्वात मोठा निर्णय घेतला असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सण, सुट्ट्यांसाठी 14 विशेष ट्रेन!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य रेल्वेने विविध सणांसाठी, उन्हाळी आणि हिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवाशांच्या फायद्यासाठी विविध ठिकाणांदरम्यान  १४ विशेष  गाड्या चालवण्याचे नियोजन  केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने ही 14 विशेष रेल्वे सेवांची योजना आखली आहे.  मडगाव, नागपूर, बेंगळुरू, लखनौ, गोरखपूर आणि हजरत निजामुद्दीम (दिल्ली) या शहरांसाठी या विशेष गाड्या धावणार आहेत.

Central Railway Block: लक्ष द्या! मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर 3 दिवस खोळंबा! डेक्कन क्वीनसह 17 एक्स्प्रेस रद्द

या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना जलद आणि आरामदायी प्रवास करणे शक्य होणार आहे. या विशेष गाड्यांमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी टू-टियर, एसी थ्री-टियर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लाससह सर्व वर्गांचा समावेश असेल, जो सर्व विभागांमधील प्रवाशांना सेवा देईल. या विशेष गाड्यांच्या वेळाही मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्या आहेत.

कधी, कुठून अन् किती वाजता सुटणार या विशेष ट्रेन?

  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते लखनऊ: 6 डिसेंबर रोजी 12.15 वाजता
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली):  6डिसेंबर रोजी 17.15 वाजता
  • पुणे ते बंगळुरू: 6 डिसेंबर रोजी 19.00 वाजता
  • नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई: 6 डिसेंबर रोजी 22.10 वाजता
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव: 7 डिसेंबर रोजी 11.10 वाजता
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई ते नागपूर: 7 डिसेंबर रोजी 15.30 वाजता
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते हैदराबाद: 7 डिसेंबर रोजी 17.20 वाजता
  • पुणे ते हजरत निजामुद्दीन (दिल्ली): 7 डिसेंबर रोजी 20.20 वाजता

    Mira Bhayandar News: मीरा भाईंदरमध्ये वाद पेटला! जातीमुळे मराठी माणसाला घर नाकारले