Pune-Mumbai Train Cancelled News: मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कल्याण-लोणावळा सेक्शनमधील लोणावळा-BVT यार्डाचे पुनर्संघटन आणि रेल्वे लाईन्सच्या विस्ताराचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे 7, 8, आणि 10 डिसेंबर 2025 रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरीय (लोकल) सेवांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे. (Mumbai Pune Trains Cancelled News)
कसा असेल मेगाब्लॉक? Block Details
समोर आलेल्या माहितीनुसार, यार्डाच्या रिमॉडेलिंग अंतर्गत डाउन यार्डात तीन R&D लाईन्स, अप यार्डात पाच R&D लाईन्सचा विस्तार आणि एक अतिरिक्त लाईन टाकण्याचे काम होणार आहे. यासाठी रविवारी 7 डिसेंबर रोी प्री एनआय ब्ल़ॉक घेतला जाणार आहे तर 8 डिसेंबर (सोमवार) आणि 10 डिसेंबर (बुधवार) रोजी पोस्ट एनआय ब्लॉक घेतला जाणार आहे. यामध्ये 7 डिसेंबर रोजी लोणावळा-BVT यार्डातील सर्व लाईन्सवर पहाटे 2.15 ते सायंकाळी 6.15 पर्यंत 16 तासांचा मोठा ब्लॉक असणार आहे.
Thane Metro News: ठाणे मेट्रो कधीपर्यंत धावणार? प्रताप सरनाईकांनी सांगून टाकलं, पण..
6 डिसेंबर रोजी रद्द झालेल्या गाड्या गाड्या| Trains cancelled on December 6 (Saturday)
- 12128 पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
- 22106 पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस.
7 डिसेंबर रोजी रद्द झालेल्या गाड्या| Trains cancelled on December 7
12127 सीएसएमटी-पुणे इंटरसिटी,
22105 सीएसएमटी-पुणे इंद्रायणी,
11007/11008 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस,
12125/12126 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, १
2123/12124 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
11009/1110 सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस.
लोकवरवर काय परिणाम होणार?
7 डिसेंबर रोजी पुणे-लोणावळा लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. पुणे-लोणावळा मार्गावरील रात्री 12.15 आणि लोणावळा-पुणे सकाळी 5.20 ची लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे/शिवाजी नगरहून लोणावळ्याकडे जाणारी सकाळी 4.45 ते सायंकाळी 5.20 पर्यंतची सेवा आणि लोणावळ्याहून पुणे/शिवाजी नगरकडे येणारी सकाळी 6.30 ते सायंकाळी 7.00 पर्यंतची सेवा तळेगाव येथे थांबेल/सुरू होईल.
Thane Traffic Update: बापरे! ठाणेकरांची आणखी वाट लागणार!! घोडबंदरबद्दलची मोठी बातमी
बदललेले वेळापत्रक आणि मार्गात बदल:
7 डिसेंबर रोजी तसेच 6डिसेंबर रोजी सुटणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, काही गाड्या अन्य मार्गाने (उदा. दौंड-अहिल्यानगर-मनमाड) वळवण्यात आल्या आहेत. यात जोधपूर-हदपसर, ग्वाल्हेर-दौंड, चेन्नई-एलटीटी, तिरुवनंतपुरम-सीएसएमटी, मिरज-निजामुद्दीन दर्शन एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.
8 डिसेंबर (सकाळी 11.25 ते दुपारी 3.25): 22159 सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस ५ मिनिटे नियंत्रित केली जाईल. 10 डिसेंबर (दुपारी 1 ते सायंकाळी 5): 16340 नागरकोइल-सीएसएमटी एक्स्प्रेस, 11008 पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस आणि 2943 दौंड-इंदूर एक्स्प्रेस 10 ते 30 मिनिटे नियंत्रित केली जातील. या दोन्ही दिवशीही पुणे-लोणावळा लोकल सेवा तळेगावपर्यंत शॉर्ट टर्मिनेट/ओरिजिनेट केली जाईल.