Pune Railway: प्रवाशांसाठी महत्त्वाचं! दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक, 16 ट्रेन रद्द, मार्गही बदलले

या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत त्याचबरोबर मार्गही वळवण्यात आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune Mega Rail Block:  पुणे रेल्वे स्थानकावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने  दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत पायाभूत सुविधा आणि सुरक्षा सुधारणा कामांच्या अनुषंगाने  १५ मे ते १९ मे २०२६ दरम्यान रेल्वे विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत त्याचबरोबर मार्गही वळवण्यात आले आहेत. 

कोणकोणत्या गाड्या झाल्या रद्द?

 गाडी क्रमांक १२११४ नागपूर-पुणे एक्सप्रेस १५, १६ आणि १७ मे रोजी रद्द राहील, 
 गाडी क्रमांक १२११३ पुणे-नागपूर एक्सप्रेस १६ आणि १८ मे रोजी रद्द राहील. 
पुणे-गोरखपूर स्पेशल (०१४१५) आणि गोरखपूर-हडपसर स्पेशल (०१४१६) या गाड्यादेखील ब्लॉक कालावधीत पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे-दानापूर स्पेशल, नागपूर-पुणे एक्सप्रेस, दादर-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, हडपसर-झांसी स्पेशल आणि पुणे-जबलपूर स्पेशल यासह अनेक विशेष आणि एक्सप्रेस गाड्या देखील निवडक तारखांना रद्द करण्यात आल्या आहेत.

IAS Transfer: IAS अधिकाऱ्यांच्या बदलीचा धडाका, पुण्यातील कारभारी बदलले; 4 अधिकाऱ्यांची निघाली ऑर्डर

कोणकोणत्या गाड्यांचे मार्ग बदलले? 

 हडपसर-नांदेड एक्सप्रेस आणि नांदेड-हडपसर एक्सप्रेस १५ ते १७ मे दरम्यान त्यांच्या नियमित मार्गाऐवजी दौंड, कुर्डुवाडी, लातूर रोड आणि परभणी मार्गे धावतील. निजामुद्दीन-येसवंतपूर एक्सप्रेस, पुणे-अमरावती एक्सप्रेस, बंगळूर-नवी दिल्ली एक्सप्रेस, जम्मू तवी-पुणे एक्सप्रेस आणि पुणे-गोरखपूर एक्सप्रेस या गाड्या पनवेल, कल्याण, नाशिक रोड आणि मनमाड मार्गे वळवलेल्या मार्गांनी धावतील. गाडी क्रमांक २२५९० हडपसर-बनारस एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक २२५८९ बनारस-हडपसर एक्सप्रेस प्रभावित तारखांना दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर आणि कोपरगाव येथील थांबे वगळतील.

 पनवेल, कल्याण आणि नाशिक रोड स्थानकांवर अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने मनमाड-निंबळक सेक्शनवर निवडक गाड्यांच्या नियमनाची घोषणा केली आहे. दानापूर-हडपसर स्पेशल गाडी १५ मे रोजी तीन तासांसाठी नियंत्रित केली जाईल, तर निजामुद्दीन-वास्को एक्सप्रेसला १५ ते १७ मे दरम्यान एक ते दीड तासांचा विलंब होईल.

HSRP number plates: 'HSRP'नंबर प्लेटसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ, आता 'या' तारखेपर्यंत मुदत, नियम मोडल्यास...

याव्यतिरिक्त, १७ मे रोजी नियोजित असलेली गाडी क्रमांक ०१४३२ गाझीपूर सिटी-हडपसर स्पेशल तिच्या मूळ स्थानकावरून चार तास उशिरा सुटेल, तर १८ मे रोजी नियोजित असलेली पुणे-हावडा दुरंतो एक्सप्रेस तिच्या नियोजित वेळेपेक्षा ३० मिनिटे उशिरा सुटेल. प्रवाशांनी आपला प्रवास सुरू करण्यापूर्वी अधिकृत नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टीम (NTES) किंवा अधिकृत NTES मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे अद्ययावत ट्रेन वेळापत्रक आणि धावण्याची स्थिती तपासावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

Advertisement