AC Local : मध्य रेल्वेच्या AC लोकलमधील फुकट्यांना दणका, प्रवाशांच्या 11 हजार व्हॉट्सअ‍ॅप तक्रारीचं निवारण

मध्य रेल्वेकडून एसी लोकलसाठी 7208819987 हा व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आला होता. प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मध्य रेल्वेवरील एसी लोकलमधून (AC ticketless passengers) फुकट्याने प्रवास करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने जवळपास एका वर्षभरात तब्बल 11 हजार तक्रारींचं निवारण केल्याची माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख प्रवक्ते डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली आहे. यासाठी वर्षभरापूर्वी सुरू केलेलं 24 तासांची व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांक आणि विशेष टास्क फोर्स फायद्याचा ठरला आहे.

25 मे 2024 रोजी मध्य रेल्वेने एसी लोकलसाठी एक विशेष टास्क फोर्सची उभारणी केली होती. एसी लोकलमधील तक्रारींवर ही विशेष टास्क फोर्स खास लक्ष ठेवून होती. याशिवाय एसी लोकलसाठी 7208819987 हा व्हॉट्सअॅप हेल्पलाइन क्रमांकही देण्यात आला होता. प्रवाशांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे.

Advertisement

25 मे, 2024 ते 30 जून, 2025 या कालावधीत 11,134 तक्रारी आल्या आहेत. या सर्व तक्रारीचं निराकरण अवघ्या दोन दिवसात करण्यात आलं आहे. जून 2024 ते 29 जून 2025 पर्यंत तक्रारी 79 पर्यंत खाली आल्या आहेत. एक दिवसाच्या तक्रारी 228 वरुन 103 पर्यंत कमी झाल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे प्रवक्ते डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं. एसी लोकलसाठी तयार करण्यात आलेला विशेष स्कॉड आलेल्या तक्रारींवर तातडीने कारवाई करतात. त्यावेळी कारवाई करणं शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी त्या तक्रारीचा फॉलोअप घेतला जातो. 

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Local Train : लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून प्रयत्न, परिवहन मंत्र्यांनी दिली सविस्तर माहिती

गेल्या वर्षभरात आलेल्या तक्रारी पाहिल्या तर 1.22 लाख अनियमित प्रवासी आढळून आले आहेत. यासाठी 4.01 कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. दररोज सरासरी 365 फुकटे प्रवासी एसी लोकलमध्ये सापडले आहेत. ज्यातून दररोज 1.19 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला. 

प्रवाशांकडूनही मध्य रेल्वेच्या या उपक्रमाचं कौतुक करण्यात आलं आहे. मुंबई उपनगरात दररोज 1810 लोकल धावतात, ज्यामध्ये 80 एसी लोकल आहेत. ज्यातून दररोज 78 हजार प्रवासी प्रवास करतात. व्हॉट्सअॅर तक्रार क्रमांकामुळे खूप मदत झाल्याचं डॉ. नीला सांगतात. मात्र या क्रमांकावर प्रवाशांनी केवळ मेसेज करावा, कॉल करू नये असंही त्यांनी सांगितलं. 

Topics mentioned in this article