Sambhajinagar News: "दानवेला अक्कल नाही...", चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंवर संताप; नेमकं काय घडलं?

अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रकांत खैरेंनी संताप व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी केलेल्या या 'फितुरी'च्या आरोपावर खैरे आज भडकले. दानवेला कळत नाही का? मी गद्दारी करणारा माणूस नाही, असं खैरे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

आकाश सावंत, बीड

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान शिवसेना (ठाकरे गट) अंतर्गत असलेला जुना वाद आता उफाळून वर आला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका करत त्यांची "अक्कल" काढली.

महापालिका निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना अंबादास दानवे यांच्यावर आपला सर्व राग काढला. गेल्या काही दिवसांपासून पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू होती, ती आज मतदानाच्या दिवशी चव्हाट्यावर आली.

वादाचे मुख्य कारण

चंद्रकांत खैरे यांच्या संतापाचे मुख्य कारण म्हणजे माजी महापौर रशीद मामू यांना मिळालेले तिकीट आहे. रशीद मामू यांना मी तिकीट दिले नाही, ते अंबादास दानवे यांनी दिले आहे. तिकीट वाटप करताना मला अंधारात ठेवले गेले आणि दानवे यांनी स्वतःची मनमानी केली, असं खैरे यांनी म्हटलं.

(नक्की वाचा-  BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)

"मी एकनिष्ठ माणूस म्हणून आजवर पक्षात टिकलो आहे. दानवे यांनी काय 'आतले' व्यवहार केले आहेत, हे मला सर्व ठाऊक आहे. जे निवडून येणारे निष्ठावंत होते, त्यांची तिकिटे कापली गेली," असा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला.

संक्रांतीचा 'तिळगुळ' ठरला वादाचे निमित्त

काल मकरसंक्रांतीनिमित्त पालकमंत्री संजय शिरसाठ यांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही आज तिळगुळ कुणाला देणार? त्यावर शिरसाट असं म्हणाले की मी तिळगुळ शिवसेनेचे निष्ठावंत चंद्रकांत खैरे यांना देणार. मात्र अंबादास दानवे यांना देणार नाही. यावर अंबादास दानवे म्हणाले होते की, "चंद्रकांत खैरे यांनी विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांचे काम केले असावे, म्हणून ते त्यांना तिळगुळ देत आहेत.

Advertisement

अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यामुळे चंद्रकांत खैरेंनी संताप व्यक्त केला. अंबादास दानवे यांनी केलेल्या या 'फितुरी'च्या आरोपावर खैरे आज भडकले. दानवेला कळत नाही का? मी गद्दारी करणारा माणूस नाही, असं खैरे म्हणाले.

(नक्की वाचा-  Kalyan News: उत्साहात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेलेल्या महिलेला धक्का; नेमकं काय झालं?)

"मातोश्री" पर्यंत तक्रार आणि पत्रकार परिषद

खैरे यांनी पुढे सांगितले की, अंबादास दानवे हे गेल्या चार दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारातून गायब आहेत आणि ही गोष्ट त्यांनी स्वतः मातोश्री (उद्धव ठाकरे) पर्यंत पोहोचवली आहे. "हे मतदान होऊ द्या, मग मी अंबादास दानवे यांच्या विरोधात मोठी पत्रकार परिषद घेऊन सर्व सत्य बाहेर काढणार," असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Advertisement