Chandrapur News: चंद्रपुरात ठाकरेंचा महापौर बसणार? 10 नगरसेवक मुंबईत; नव्या खेळीने काँग्रेसला धक्का

ठाकरे गट–वंचित बहुजन आघाडी युतीला एकूण ८ जागांवर विजय मिळाला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ६ तर वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Chandrapur Municiple Corporation Election 2026:  चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. चंद्रपुरात कोणत्याच पक्षाल बहुमत मिळालेलं नाही, त्यामुळे बहुमतासाठी सर्वच पक्षांकडून नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे. अशातच  ठाकरे-वंचितच्या खेळीने चंद्रपुरच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून ठाकरे-वंचितच्या पाठींब्यावर काँग्रेस-भाजपचे भविष्य ठरणार आहे. त्यामुळे ठाकरे गटाने थेट अडीच वर्ष महापौरपद देण्याची मागणी करत काँग्रेसची कोंडी केली आहे. 

चंद्रपूर महानगरपालिकेत मोठा ट्वीस्ट

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून त्यांनी आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट–वंचित बहुजन आघाडी युतीला एकूण ८ जागांवर विजय मिळाला आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ६ तर वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक निवडून आले आहेत. 

Pune News: पुण्यात किती उमेदवारांची डिपॉझिट झाले जप्त? डिपॉझिट जप्त होणारे सर्वाधिक उमेदवार कोणत्या पक्षाचे?

कालच या सर्व नगरसेवकांनी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती. आता मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे. महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने ठाकरे गट आणि वंचित आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार आहे. जो पक्ष आम्हाला महापौर पद देईल, त्याच्यासोबत आम्ही जाणार, अशी भूमिकाही ठाकरे सेनेन घेतली आहे.

अडीच वर्ष आमचा महापौर..

"चंद्रपूरमधील निवडणूक शिवसेना आणि वंचित युतीत लढले. युतीचे 8 नगरसेवक निवडून आले आणि 2 अपक्ष यांनी समर्थन दिलं आहे.  अजून आमचा गट स्थापन झालेला नाही. खायला दिलं आहे पण खाता येत नाही अशी अवस्था काँग्रेसची झाली आहे. अडीच वर्ष महापौर आमचा असेल आणि जर नाही तर अडीच वर्ष उपमहापौर आणि स्टँडिंग आमचा असेल.  आमचा सर्वस्वी निर्णय उद्धव ठाकरे घेतील. भाजपसोबत जाण्यासाठीही आमचा हाच फॉर्म्युला असेल," असे नगरसेवक प्रशांत कदम यांनी स्पष्ट केले आहे. 

नक्की वाचा - Pune News: निवडून येताच भाजपच्या नगरसेवकांचा राडा, नगरसेविकेच्या भावावर हल्ला! प्रकरणाला वेगळचं वळण