जाहिरात

Pune News: निवडून येताच भाजपच्या नगरसेवकांचा राडा, नगरसेविकेच्या भावावर हल्ला! प्रकरणाला वेगळचं वळण

एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी झाली.

Pune News: निवडून येताच भाजपच्या नगरसेवकांचा राडा, नगरसेविकेच्या भावावर हल्ला! प्रकरणाला वेगळचं वळण
  • पुण्यात बॅनर लावण्याच्या वादातून नगरसेविका मृणाल कांबळे यांच्या भावावर हल्ला
  • खडक पोलीस ठाण्यात शंतनू कांबळे यांनी तक्रार दाखल केली दाखल
  • वाद बॅनर लावण्याच्या कारणास्तव झाला आणि तो हाणामारीत रूपांतरित झाला
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
पुणे:

अविनाश पवार 

पुण्यात बॅनर लावण्याच्या वादातून एका नगरसेविकेच्या भावावर टोळक्याने हल्ला केला आहे. त्याला बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी 14 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे भाजपच्या नगरसेविका अर्चना पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोहिया नगर, काशेवाडी परिसरात बॅनर लावण्यावरून दोन गटांमध्ये वाद झाला होता. त्यातून ही मारहाण झाल्याचं बोललं जात आहे. 

हा वाद वाढत जाऊन एका गटाच्या टोळक्याने हल्ला करत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत नगरसेविका मृणाल कांबळे यांचे भाऊ शंतनू कांबळे जखमी झाले आहेत. त्यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाला वेगळे वळण देत बापू कांबळे यांनी तुषार पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

नक्की वाचा - Mumbai BMC Mayor Election: महापौर कोण आणि कोणाचा ? आज कळणार

माझी मुलगी मागासवर्गीय असून तिला तुषार पाटील सातत्याने त्रास देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भातही खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. दोन्ही तक्रारींचा तपास सुरू असून पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

नक्की वाचा: महायुतीत कलह! मुंबईत शिवसेनेने केला भाजपचा गेम? 11 प्रभागांमध्ये छुपी खेळी केल्याचा आरोप

एकाच प्रभागातून निवडून आलेल्या 2 भाजप नगरसेविकांच्या कार्यकर्त्यांमध्ये फ्लेक्स लावण्यावरुन हाणामारी झाली. पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी तुषार पाटील यांनी माफी मागितली आहे. या हाणामारीनंतर  मोठ्या संख्येने समाजातील लोक खडक पोलीस स्टेशनला जमले होते. बापू कांबळे यांनी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं. त्यानंतर  तुषार पाटील यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे हा विषय आम्ही सोडून दिल्याचा बापू यांनी सांगितलं आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com