Chandrapur News : बापाची माया! चंद्रपुरात पुराच्या पाण्यातून लेकीला घेऊन धावला; मायेच्या ओढीने पुराला हरवले

Chandrapur News : 'बाप तो बाप होता है...' हे वाक्य  किती खरं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Chadrapur News : एका बापाने आपल्या 3 वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी घेतली.
मुंबई:

अभिषेक भटपल्लीवार, प्रतिनिधी

Chandrapur News : 'बाप तो बाप होता है...' हे वाक्य  किती खरं आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रपूर जिल्ह्यातील चारवट गावात पुन्हा एकदा सिद्ध झालं. इरई नदीला आलेल्या पुरामुळे चारवट गावाचा संपर्क जिल्ह्याशी पूर्णपणे तुटला असताना, एका बापाने आपल्या 3 वर्षांच्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यात उडी घेतली.

श्वेता आणि आशिष धोबे यांची 3 वर्षांची मुलगी अधिरा गेल्या चार दिवसांपासून तापाने त्रस्त होती. गावात रुग्णालय नसल्याने तिची वेदना बघून आई-वडिलांचे मन तुटत होते. अखेर, पुराचे पाणी पुलावरून थोडे कमी होताच, आशिषने आपल्या लेकीला खांद्यावर घेतले आणि पत्नी श्वेता व मदतनीस रवी थिपे यांच्या मदतीने गुडघाभर पाण्यातून पूल ओलांडला.

जीव वाचवण्याची ही धडपड कॅमेऱ्यात कैद झाली आणि सोशल मीडियावर व्हायरल होताच या आई-वडिलांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. एका क्षणासाठीही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, लेकीसाठी पुराशी लढणाऱ्या या बापाने 'बाप तो बापच' हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं.

( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )

पावसामुळे बळीराजा हतबल

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बळीराजा पूर्णपणे हतबल झाला आहे. सावली तालुक्यात 1378 हेक्टरहून अधिक पिकांचे, विशेषतः कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

Advertisement

पोळ्याच्या सणाच्या पूर्वसंध्येला आनंद-उत्साहाचे वातावरण असताना, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याला मात्र दुःखाची किनार लागली. अडेगावात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीत झालेल्या नुकसानीला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. गणपत भाऊजी नागापुरे असं या दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव आहे.

गणपत यांच्याकडे असलेल्या तीन एकर शेतीमध्ये त्यांनी मोठ्या कष्टाने कापूस आणि धान पेरले होते. मात्र, वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले. डोळ्यासमोर पीक नष्ट होताना पाहण्याचा असह्य वेदना त्यांना सहन झाली नाही. याच विचारातून त्यांनी शेतात जाऊन कीटकनाशक प्राशन करून स्वत:ची जीवनयात्रा संपवली.

Advertisement
Topics mentioned in this article