Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील

Chandrapur News: चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर तीन रुग्णांची दृष्टी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील नामांकित ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना कायमचे अंधत्व आल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर झालेल्या जंतूसंसर्गामुळे तीन रुग्णांनी आपली दृष्टी गमावली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने तातडीने कारवाई करत रुग्णालय सील केले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

ख्रिस्तानंद मिशनरीतर्फे चालवल्या जाणाऱ्या या रुग्णालयात अल्पदरात उपचार मिळत असल्याने येथे मोठी गर्दी असते. काही दिवसांपूर्वी येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र, शस्त्रक्रियेनंतर काही रुग्णांना गंभीर जंतूसंसर्ग झाला. या संसर्गामुळे 3 रुग्णांना आपली दृष्टी गमवावी लागल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे प्राप्त झाली होती.

Advertisement

(नक्की वाचा-  VIDEO: पुण्यात वसुलीवरून राडा! हडपसरमध्ये भररस्त्यात एजंट आणि ग्राहकाची हाणामारी)

चौकशीत धक्कादायक खुलासे 

जिल्हा शल्य चिकित्सकांनी नियुक्त केलेल्या विशेष चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. स्वतंत्र नेत्ररोग खाटा मंजूर नसतानाही येथे अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालवले जात होते. रुग्णालयाने ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट 1949' च्या तरतुदींचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळले आहे. तर राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या मानकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले होते.

(नक्की वाचा-  Thane News: ठाणेकरांची चिंता वाढली! 3 दिवसांत 6 मुले गायब, नेमकं काय घडतंय?)

रुग्णालयावर कारवाई

रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रुग्णालयावर प्रशासनाने तातडीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. रुग्णालयाची नोंदणी तातडीने रद्द करण्यात आली असून ऑपरेशन थिएटर आणि इतर महत्त्वाचे विभाग सील करण्यात आले आहेत. जंतूसंसर्ग नेमका कशामुळे झाला, यासाठी वापरलेली औषधे आणि साहित्याचीही तपासणी केली जात आहे.
 

Topics mentioned in this article