Chandrapur News: कर्जासाठी सावकाराचा त्रास, शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, भयंकर प्रकाराने महाराष्ट्र हादरला

रोशन कुडे यांच्या म्हणण्यानुसार, एका लाखावर दिवसाला १० हजार रुपये प्रमाणे व्याज आकारले जात होते, ज्यामुळे मूळ रक्कम व व्याजाचा आकडा ७४ लाखांपर्यंत पोहोचला.

जाहिरात
Read Time: 3 mins

Chandrapur Farmer News: चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथुर गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. कर्जबाजारीपणामुळे पिचलेल्या एका शेतकऱ्याला सावकाराच्या भरमसाट व्याजवसुलीमुळे आणि सततच्या त्रासामुळे स्वतःची किडनी विकावी लागली आहे. या क्रूर प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

सावकाराचा कर्जासाठी तगादा, शेतकऱ्याने किडनी विकली

​ रोशन सदाशिव कुडे (रा. मिंथुर, जि. चंद्रपूर) असे या पीडित शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती आहे, ज्यावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. शेतीत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने त्यांनी पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी दोन वेगवेगळ्या सावकारांकडून प्रत्येकी ५०-५० हजार रुपये असे एकूण १ लाख रुपयांचे कर्ज घेतले. ​नशिबाने येथेही त्यांची साथ दिली नाही. खरेदी केलेल्या गाई दुर्दैवाने मरण पावल्या आणि शेतीतूनही अपेक्षित उत्पन्न आले नाही. यामुळे त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढत गेला.

Jalgaon News: सकाळी शाळेत गेली, संध्याकाळी फक्त दप्तर सापडलं, 9 वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता

​कर्ज फेडण्यासाठी सावकार त्यांच्या घरी येऊन सतत तगादा लावत असत आणि नको ते बोलू लागले. या त्रासाला कंटाळून रोशन कुडे यांनी त्यांची दोन एकर जागा विकली, ट्रॅक्टर विकला आणि घरातील इतर सामानही विकले, पण कर्ज काही संपले नाही. ​सावकारांनी लावलेल्या भरमसाठ व्याजामुळे एका लाखाचे कर्ज वाढत जाऊन तब्बल ७४ लाखांवर पोहोचले. रोशन कुडे यांच्या म्हणण्यानुसार, एका लाखावर दिवसाला १० हजार रुपये प्रमाणे व्याज आकारले जात होते, ज्यामुळे मूळ रक्कम व व्याजाचा आकडा ७४ लाखांपर्यंत पोहोचला.

​जेव्हा कर्ज फेडण्याचे सर्व मार्ग बंद झाले, तेव्हा कर्ज घेतलेल्या एका क्रूर सावकाराने त्यांना आपली किडनी विकण्याचा सल्ला दिला. ​या सल्ल्यानुसार, एका एजंटने रोशन कुडे यांना कोलकत्ता येथे नेले. ​तेथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ​तपासणी पूर्ण झाल्यावर, त्यांना कंबोडिया येथे नेण्यात आले आणि तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आली. ​रोशन कुडे यांनी ही किडनी आठ लाख रुपयांना विकली. ​किडनी विकल्यानंतरही रोशन कुडे यांचे संपूर्ण कर्ज फिटलेले नाही आणि सावकारांचा पैशांसाठीचा तगादा अजूनही सुरूच आहे.

Advertisement

पोलिसांचे दुर्लक्ष

​पीडित शेतकरी रोशन कुडे यांनी सांगितले की, त्यांनी न्याय मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी वेळीच याकडे लक्ष दिले नाही आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. जर पोलिसांनी वेळीच सावकारांवर कारवाई केली असती, तर आज त्यांच्यावर किडनी विकण्याचा हा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता, असे त्यांचे म्हणणे आहे.

Latur Car Burning Case: 1 कोटींसाठी लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला जाळलं, 'त्या' चॅटिंगने सत्य समजलं, असा रचला कट...

​कर्ज फेडण्यासाठी स्वतःची किडनी गमावलेल्या रोशन कुडे यांनी आता सरकारकडे न्याय मागितला आहे. "एक लाख कर्ज घेतले होते, त्याचे ७४ लाख झाले. कर्ज फेडण्यासाठी किडनी गेली. आता हातात काहीच उरले नाही. जर न्याय मिळाला नाही, तर मंत्रालयापुढे संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करू," अशी हृदय पिळवटून टाकणारी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Advertisement