जाहिरात

Jalgaon News: सकाळी शाळेत गेली, संध्याकाळी फक्त दप्तर सापडलं, 9 वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता

सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली; मात्र त्यानंतर तिचा काहीही मागोवा मिळालेला नाही.

Jalgaon News: सकाळी शाळेत गेली, संध्याकाळी फक्त दप्तर सापडलं, 9 वर्षांची चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता

मंगेश जोशी, जळगाव:

Jalgaon School Girl Missing Case:  जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात 9 वर्षीय चिमुकली रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.  धनश्री शिंदे असं या चौथीत शिकणाऱ्या चिमुकलीचे नाव आहे. 3 दिवस उलटूनही चिमुकलीचा तपास लागत नसल्याने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त केला जात आहे. गावामध्ये एलसीबीच्या पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ठाण मांडले असून कसून तपास सुरु आहे. 

शाळेत गेली परतलीच नाही...

समोर आलेल्या माहितीनुसार,  जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणारी ९ वर्षीय धनश्री उमेश शिंदे ही चिमुकली रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.  शुक्रवारी (१२ रोजी) सकाळी १० वाजता शाळेत गेलेली धनश्री सायंकाळी घरी परतलीच नाही.

Latur Car Burning Case: 1 कोटींसाठी लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला जाळलं, 'त्या' चॅटिंगने सत्य समजलं, असा रचला कट...

आई-वडील शेतातून घरी परतल्यानंतर मुलगी न आढळल्याने शाळेत चौकशी केली असता, सायंकाळी 5 वाजेपर्यंत ती शाळेत होती व नंतर घरी निघाल्याचे शिक्षकांनी सांगितले.  कुटुंबीय व ग्रामस्थांनी सर्वत्र शोध घेतला. ग्रामपंचायतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता ती न्हावे रस्त्याने ग्रामपंचायत कार्यालयाजवळून जाताना दिसून आली; मात्र त्यानंतर तिचा काहीही मागोवा मिळालेला नाही.

दप्तर सापडले, अपहरणाचा संशय

गावाबाहेरील शेत रस्त्यावर धनश्रीचे दप्तर आढळून आले असून अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.  याप्रकरणी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rana Balachauria Murder: 'सिद्दू मुसेवालाच्या हत्येचा बदला', कबड्डीपटू राणा बालचौरियाला गोळ्या झाडून संपवलं

दरम्यान, जळगाव एलसीबीसह वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी गावात ठाण मांडून असून आजूबाजूचा परिसर व शेतशिवार पिंजून काढत शोधमोहीम सुरू आहे. मात्र 3 दिवस उलटूनही चिमुकलीचा थांगपत्ता न लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. 9 वर्षांची चिमुकली अशी रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com