Shocking: विद्युत खांबाला लटकलेला तरुण.. रेल्वे स्टेशनवर भयंकर दृश्य, परिसरात खळबळ, नेमकं काय घडलं?

दुर्गेश प्रसाद मसराम असे मृत युवकाचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील कोको येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chandrapur News:  चंद्रपुरच्या भांदक रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ एका १८ वर्षीय युवकाने वीज खांबाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुर्गेश प्रसाद मसराम असे मृत युवकाचे नाव असून, तो मूळचा मध्य प्रदेशातील कोको येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं? 

​मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गेश हा आपल्या कुटुंबासह मोलमजुरीसाठी भांदक येथे आला होता. सध्या भद्रावती रेल्वे स्थानक परिसरात वर्धा-बल्लारशाह रेल्वे मार्ग आणि सायडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आलेल्या मजुरांची वस्ती याच परिसरात आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास दुर्गेश हा आपल्या घरात दिसून आला नाही. कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध केली असता, रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील एका वीज खांबाला त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

Holi Special Train: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट, 1448 विशेष ट्रेन धावणार; पाहा वेळापत्रक

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अत्यंत तरुण वयात दुर्गेशने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरपीएफ या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

कुडाळच्या पिंगुळी रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह

दुसरीकडे, सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर एका अज्ञात इसमाचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हि घटना आज सायंकाळी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास घडली. अपघात की आत्महत्या याबाबतचा तपास कुडाळ पोलीसांकडून सुरू करण्यात आला आहे.  पिंगुळी येथे कोकण रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या गाडीच्या धडकेत संबंधित इसम गंभीर जखमी झाला. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

घटनेची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.