जाहिरात

Holi Special Train: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट, 1448 विशेष ट्रेन धावणार; पाहा वेळापत्रक

रेल्वेच्या एकूण विशेष सेवांची संख्या १४४८ आहे, ज्यामध्ये ३२८ होळी विशेष सेवा, १४८ विशेष सेवा आणि ९७२ उन्हाळी विशेष सेवा या समाविष्ट आहेत. 

Holi Special Train: होळीला गावी जाताय? मध्य रेल्वेकडून मोठं गिफ्ट, 1448 विशेष ट्रेन धावणार; पाहा वेळापत्रक

 Central Railway Special Trains:  प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे विशेष गाड्यांची वेळ वाढवून त्यांना विशेष गाड्या, होळी विशेष आणि उन्हाळी विशेष गाड्या म्हणून चालवणार आहे. रेल्वेच्या एकूण विशेष सेवांची संख्या १४४८ आहे, ज्यामध्ये ३२८ होळी विशेष सेवा, १४८ विशेष सेवा आणि ९७२ उन्हाळी विशेष सेवा या समाविष्ट आहेत. 

साप्ताहिक गाड्या

ट्रेन क्रमांक 01435: सोलापूर- लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई साप्ताहिक विशेष २४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दर मंगळवारी चालवण्यासाठी अधिसूचित करण्यात आली आहे. आता ती ०३ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष ट्रेन म्हणून, दि. ०७ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष ट्रेन म्हणून आणि दि. २१ एप्रिल २०२६ ते १४ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष ट्रेन म्हणून चालविण्यात येईल. (२० सेवा)

रेल्वे क्रमांक 01436: लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- सोलापूर साप्ताहिक विशेष, दर बुधवारी २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालवण्यासाठी अधिसूचित, आता दि. ४ मार्च २०२६ ते ०१ एप्रिल २०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या म्हणून, दि. ८ एप्रिल २०२६ ते १५ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष गाड्या म्हणून आणि दि. २२ एप्रिल २०२६ ते १५ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येईल. (२० सेवा)

ट्रेन क्रमांक 01477:  सोलापूर - अनकापल्ले साप्ताहिक विशेष दि. २७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दर शुक्रवारी चालवण्यासाठी अधिसूचित विशेष, आता  दि. ६ मार्च २०२६ ते २७ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या म्हणून, दि. ३ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२६ पर्यंत विशेष गाड्या म्हणून आणि दि. १७ एप्रिल २०२६ ते १० जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येईल. (१९ सेवा)

ट्रेन क्रमांक 01478: अनकापल्ले - सोलापूर साप्ताहिक विशेष दि. २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दर शनिवारी चालवण्यासाठी अधिसूचित विशेष, आता दि. ०७ मार्च २०२६ ते २८ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या म्हणून, दि. ०४ एप्रिल २०२६ ते ११ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष गाड्या म्हणून आणि दि. १८ एप्रिल २०२६ ते ११ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष गाड्या म्हणून चालविण्यात येईल. (१९ सेवा)

Ulhasnagar News :उल्हासनगरच्या भर चौकातून उचलले अन् माथेरानच्या लॉजवर नग्न करून अमानुष छळ! कारण काय?

दैनिक गाड्या

२८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत दररोज चालवण्यासाठी अधिसूचित खालील दैनिक गाड्या दि. १५ जुलै २०२६ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार  आहेत. या गाड्या आता दि. ०१ मार्च २०२६ ते ३१ मार्च २०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या म्हणून, दि. ०१ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ पर्यंत विशेष गाड्या म्हणून आणि दि. १५ एप्रिल २०२६ ते १५ जुलै २०२६ पर्यंत उन्हाळी विशेष गाड्या म्हणून धावतील.

  • गाडी क्रमांक 01461 सोलापूर- दौंड दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01462 दौंड - सोलापूर दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01465  सोलापूर - कलबुर्गी दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01466  कलबुर्गी -सोलापूर दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01487 हडपसर -हरंगुल दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01488 हरंगुल-हडपसर दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर - पुणे दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • गाडी क्रमांक 01023 पुणे-कोल्हापूर दैनिक विशेष (१३७ फेऱ्या) 
  • गाडी क्रमांक 01211 बडनेरा - नाशिक दैनिक विशेष (१३७ सेवा)
  • ट्रेन क्रमांक 01211 नाशिक-बडनेरा दैनिक विशेष गाड्या (१३७ सेवा)
     

( नक्की वाचा : Beed News: बीडमध्ये बिल्डरला चक्क महिला बाऊन्सर्सचा पहारा! वाचा कुणाच्या दहशतीमधून घेतला निर्णय? )

दरम्यान, या गाड्यांच्या वेळा, मार्ग, संरचना आणि थांबे तेच राहतील. या विशेष गाड्यांसाठी (०१४७८ वगळता) १६.०२.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि प्रगत आरक्षण कालावधी (एआरपी) अंतर्गत प्रवासांसाठी www.irctc.co.in वेबसाइटवर बुकिंग सुरू होईल.

एआरपीच्या पलीकडे प्रवासासाठी बुकिंग लागू असल्यास संबंधित त्यानंतरच्या एआरपी तारखांना उघडेल. सामान्य शुल्कासह अनारक्षित डब्यांसाठी बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येते. प्रवासी तिकिटांचे बुकिंग करण्यासाठी रेलवन अॅप देखील डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com