अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर: भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओयो बाबत विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नानंतर चंद्रपूर पोलीस ॲक्शन मोडवर आली असून 'ओयो' हे ट्रेडमार्क अवैधपणे वापरणाऱ्या 15 हॉटेल्स वर चंद्रपूर पोलिसांनी कारवाई केली आहे. अहमदाबाद येथील ओयो हॉटेलचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओयो हॉटेल्सचे नोडल अधिकारी मनोज पाटील यांनी काही हॉटेल्सबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील सर्वच हॉटेलची तपासणी सुरू केली असून या पाहणीत आतापर्यंत 15 हॉटेल अनधिकृत पणे ओयो ब्रॅण्डचा दुरूपयोग करित असल्याचे निदर्शनास आले आहे.
Jalgaon News: निलेश राणेंना शासकीय कार्यालयात बंदी, थेट जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
चंद्रपूर शहरातील 15 हॉटेल व लॉजचे मालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने हॉटेल व्यवसायिकांमध्ये यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ओयो हे ट्रेडमार्क वापरून चंद्रपूर शहरातले अनेक हॉटेल्स अवैध धंदे करत असल्याची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर शहरात ओयो सलग्न फक्त 4 हॉटेल असून ओयोचा दुरुपयोग करून अनेक हॉटेल आपला व्यवसाय करत आहेत.
काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?
महाराष्ट्रामध्ये OYO नावाची हॉटेल्सची चेन तयार झाली आहे. शहरापासून वीस वीस किलोमीटर अंतरावर निर्जन ठिकाणी OYO हॉटेल्स दिसत आहेत. मग मनात शंका आली की ही ओयो हॉटेल्स काय आहे? ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे. या हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली भाड्याने दिली जाते, ती कशासाठी दिली जाते? हा एक पोलीस विभागाच्या विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. असा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला होता.
Latur News: 'छावा'च्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, शेतकरी संघटना आक्रमक; आज 'लातूर बंद'ची हाक