जाहिरात

Latur News: 'छावा'च्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, शेतकरी संघटना आक्रमक; आज 'लातूर बंद'ची हाक

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे आता राज्यभर पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. 

Latur News: 'छावा'च्या पदाधिकाऱ्यांना मारहाण, शेतकरी संघटना आक्रमक; आज 'लातूर बंद'ची हाक

Chhava Sanghatana Rada Latur: कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी सभागृहात पत्ते खेळल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. या कृत्याचा निषेध म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत पत्ते उधळले ज्यावरुन जोरदार राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचे आता राज्यभर पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. 

छावा संघटनेकडून लातूर बंदची हाक

लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पगार गटाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर लातूरमध्ये धावा संघटनेच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्ष संघटनाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. ज्या अपोलो हॉस्पिटलमध्ये घाडगे यांच्यावर उपचार सुरू आहेत त्या ठिकाणी मोठ्या संख्येने छावाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह अनेक पक्षातील आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली.  या कार्यकर्त्यांनी लातूर बंदची हाक देखील दिली आहे आज दिवसभर लातूर शहर बंद असणार आहे.

Latur News: 'हे पत्ते कृषीमंत्र्यांना द्या' छावाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते उधळले, जोरदार राडा

लातूर येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले.  नांदेडमध्ये रात्री छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन केले.  लातूर घटनेच्या निषेधार्थ नांदेड मध्ये छावा संघटनेकडून टायर जाळून आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. दुसरीकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून  नंदी स्टॉप परिसरातील अजित पवार आणि सुनील तटकरे यांचे फोटो असलेले बॅनर्सही फाडण्यात आलेत. छावा संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी अनेक ठिकाणी लातूरमध्ये लागलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बॅनर हे फाडले आहेत.

लातूरमधील राड्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर येणार आहेत.आई तुळजाभवानी देवीचे आशीर्वाद घेऊन ते धाराशिव दौऱ्याला सुरुवात करतील. काल लातूरमधील राड्यानंतर धाराशिवमधील शेतकरी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झालेत. काल झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज आंदोलन होण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार  आहे. काल लातूरमध्ये हाणामारीची झालेली घटना ताजी असल्याने तटकरेंच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Manikrao Kokate Video: अधिवेशनात रंगला 'जंगली रम्मी'चा डाव! कृषिमंत्री कोकाटेंचा VIDEO व्हायरल

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com