Gabbar Viral Letter : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'गब्बर' सिनेमा बॉक्सऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. या सिनेमामध्ये अक्षय कुमार भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हत्या करून त्यांना भर चौकात लटकवतो, असा विषय पाहायला मिळाला. आता असाच गब्बर छत्रपती संभाजीनगरमध्ये आला आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण सोशल मीडियावर अशाच एका गब्बरचं पत्र व्हायरल होत आहे. ज्यात आपण शंभर लोकांची गॅंग तयार केली असून, लवकरच संभाजीनगरमधील भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा हत्याकांड करणार असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे हे भर चौकात हत्या करणार असल्याचा दावा देखील या पत्रात करण्यात आला आहे. या व्हायरल पत्राने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
(नक्की वाचा: राज्यातील शाळांमध्ये 15 जूनपासून 'एक राज्य, एक गणवेश' योजना लागू, हे आहेत नियम)
विशेष म्हणजे स्वतःला गब्बर सांगणाऱ्या या व्यक्तीने ' रिश्वत मत लेना वरना गब्बर आये जायेगा' असा उल्लेख देखील पत्रात केला आहे. तर "आता इथून पुढे औरंगाबाद शहरात गुन्हेगारीचा एक नवा अध्यायः मी सुरू करणार आहे. या सर्वांचा हत्याकांड लवकरात लवकरच मी करेल ते पण भर चौकात आम्ही AK47ने गोळ्या घालून यांचा हत्याकांड घडून आणू", असे देखील पत्रात उल्लेख आहे.
(नक्की वाचा: Mumbai Coastal Road: मुंबई कोस्टल रोडमुळे प्रवास झाला सुखकर, प्रवाशांना मिळणार हे फायदे)
नेत्यांसह अधिकाऱ्यांची पत्रात नावं...
गब्बरच्या नावाने व्हायरल होत असलेल्या या पत्रात अनेक लोकांची नावं आहे. ज्यात एका माजी कॅबिनेट मंत्र्यासह त्यांच्या पुत्राचे नाव आहे. सोबतच एका आयपीएस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांची देखील नाव आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची देखील नाव आहे. या सोबतच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या नावाचा देखील उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. याचवेळी गावात काही गावगुंड निर्माण झाले असून, त्यांचा सामान्य नागरिकांना त्रास होत असून त्यांना देखील आपण संपवणार असल्याचे उल्लेख या पत्रामध्ये पाहायला मिळतो.
(नक्की वाचा: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, भाज्यांची आवक घटल्याने दर कडाडले)
100 लोकांची गॅंग तयार...
याच पत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख दिसून येत आहे. ज्यात, 'आपण खूप मोठा हत्याकांड मी घडवणार आहे. कारण आता माझ्याकडे पण एकूण 100 जणांची गँग तयार आहे. आता माझा कायदा सुव्यवस्थेवरून विश्वास उडाला आहे आणि मी स्वतः माझ्या हाताने न्याय करणार आहे, असे पत्रात लिहिण्यात आले आहे.