Viral News: नियतीचा क्रुर खेळ! 2 वर्षांच्या शंभुला वाचवण्यासाठी आईची धाव, दवाखान्याच्या पायरीवर जीव सोडला

वाटेत ते आपल्या मुलाला वाचवण्यासाठी देवाचा धावा करत होते, मात्र सापाचे विष चिमुकल्याच्या अंगात भिनल्याने त्याची प्रकृती खालावत होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल मस्के, प्रतिनिधी:

Chhatrapati Sambhajinagar Snake Bite: 2 वर्षाच्या शंभूला घेऊन आईने दवाखाना गाठला, पण नियतीने अर्ध्यातच घात केला. संभाजीनगर तालुक्यातील कुंभेफळ येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. अवघ्या २ वर्षांच्या चिमुकल्या शंभूचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला असून या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

Mumbai News: लाईव्ह कॉन्सर्ट... ओव्हरडोस; तरुण- तरुणीच्या मृत्यूने मुंबईत खळबळ, 5 अटकेत

चिमुकल्या शंभुला सर्पदंश..

छत्रपती संभाजीनगरमधील दांडगे कुटुंबावर शनिवारी दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबातील चिमुकला शंभू ज्ञानेश्वर दांडगे आपल्या राहत्या घराच्या जिन्यावर खेळत होता. शंभू ज्याठिकाणी खेळत होता त्याच ठिकाणी एक भलामोठा नाग बसला होता. खेळता खेळता चिमुकल्या शंभूचा पाय त्या सापावर पडला. पाय पडताच सापाने शंभूला जोरात दंश केला. तो जोरजोरात रडायला लागला. 

Advertisement

शंभूचा रडण्याचा आवाज ऐकून आई पळत पळत जिन्याकडे आली अन् समोरचे दृश्य पाहून हादरली. चिमुकल्या शंभूच्या पायातून रक्त वाहत होते अन् त्याच्या शेजारीच भलामोठा साप दिसत होता. नेमकं काय घडलंय याची कल्पना आल्यानंतर आईने तात्काळ आपल्या लेकराला कवटाळलं अन् दवाखान्याकडे धाव घेतली. मिळेल त्या वाहनाने त्यांनी दवाखाना गाठला. वाटेत ते आपल्या मुलाला वाचवण्यासाठी देवाचा धावा करत होते, मात्र सापाचे विष चिमुकल्याच्या अंगात भिनल्याने त्याची प्रकृती खालावत होती. 

कुटुंबियांचा आक्रोश 

सर्पदंशाने बेशुद्ध झालेल्या चिमुकल्याने दवाखान्याच्या पायरीवर आपला जीव सोडला. डॉक्टरांनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने दांडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या आई- वडिलांचा आक्रोश सर्वांचेच काळीज पिळवटून टाकत होता. ज्याच्य चिमुकल्या पावलांनी घरात गोकुळ नांदत होतं त्या चिमुकल्याच्या अशा अकाली मृत्यूने गावावरही शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Asha Bhosle: आशा भोसलेंच्या निधनानंतर पाकिस्तानात वाद! 'जिओ न्यूज' अडचणीत, काय आहे प्रकरण?

Topics mentioned in this article