Mumbai Drug Case: मुंबई शहरात एका लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये एक तरुण आणि एका तरुणीचा समावेश आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले असून मुंबई- पुण्यातील ड्रग्जचा विळखा आता थेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
Pune Water Supply: पुणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद; काय आहे कारण?
ड्रग्सचा ओव्हरडोस, दोघांचा मृत्यू
गोरेगाव येथील नेस्को (NESCO) एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित एका लेट-नाईट टेक्नो म्युझिक कॉन्सर्टला गालबोट लागले आहे. अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन उच्चशिक्षित एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी कठोर पावले उचलत कार्यक्रमाचे आयोजक, नेस्कोचे कर्मचारी आणि मृतांच्या दोन मित्रांसह पाच जणांना अटक केली आहे.
शनिवारी रात्री आयोजित या संगीताच्या कार्यक्रमाला सुमारे ३ ते ४ हजार तरुणांची गर्दी होती. प्राथमिक माहितीनुसार, या कार्यक्रमात ड्रग्जचे वितरण, अल्पवयीन मुलांना मद्यपुरवठा आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. प्रकृती बिघडलेल्या दोन तरुणींना जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअरमध्ये, तर एका तरुणाला गोरेगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला, तर सोमवारी दुपारी एका तरुणीनेही प्राण गमावले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईलच, परंतु या घटनेने मुंबईतील हाय-प्रोफाईल पार्ट्यांमधील अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world