छत्रपती संभाजीनगर: प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वप्नातील घर असावं अशी इच्छा असते. सर्वसामान्य व्यक्ती हेच आपलं स्वप्नातील घर तयार करण्यासाठी पै पै करून पुंजी जमवत असतो. पण आयुष्यभराची कमाईतून घेतलेल्या घरातून अवघ्या चार वर्षात बेघर होण्याची वेळ असेल तर हे अत्यंत वेदनादायक असेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फारोळा गावात असाच काही प्रकार समोर आला आहे.
एखाद्या गावावर नैसर्गिक संकट आल्यावर जीव वाचवण्यासाठी तेथील गावकरी शाळेत किंवा मंदिरात जमा होतात. दृश्यांमध्ये दिसणाऱ्या या कुटुंबांवर देखील एक संकट ओढावला असून, त्यानं गावाच्या मंदिरात राहण्याची वेळ आली आहे. पण त्यांच्यावर कोणतेही नैसर्गिक नव्हे एका बिल्डराच्या कृत्यामुळे संकट उभं राहिले आहे.
Wardha Crime: ड्रग्ज तस्करीसाठी 2 महिन्यांच्या बाळाचा वापर; 16 लाखांचे MD ड्रग्ज जप्त
त्याचं झालं असे की छत्रपती संभाजीनगरमधील फरोळा गावात उभारण्यात आलेली हरिकुंज सोसायटीमधील इमारत अक्षरशः कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे येथील रहिवासी मृत्यूच्या सावटाखाली राहत आहेत. रघुवीर रियालिटीजचे बिल्डर दीपक झुनझुनवाला यांनी 2019 मध्ये उभारलेली ही चार मजली इमारत अवघ्या चार वर्षात कोसळण्याच्या मार्गावर आहे. इमारतीच्या मुख्य कॉलमला तडे गेले आहेत. त्यामुळे बिल्डरने अक्षरशा जॉक लावले आहे.
या इमारतीत राहणारे अनेक कुटुंबं अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होते. पण आता ग्रामपंचायत आणि महसूल विभागाने ही इमारत धोकादायक असल्याचे सांगत इमारत खाली करण्याबाबत नोटीस लावली आहे. त्यामुळे या इमारतीत राहणारे 70 पेक्षा अधिक लोक गेल्या सात दिवसांपासून एका मंदिरात राहत आहे. संबंधित बिल्डरकडून बांधकाम अत्यंत निष्काळजीपणाने करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
(नक्की वाचा : Kalyan News : म्हाडाच्या प्रकल्पावरुन कल्याणमध्ये महायुतीत चांगलीच जुंपली, आजी-माजी आमदार आमने-सामने )
तर इमारतीच्या गुणवत्तेची कोणतीही खातरजमा न करता फ्लॅट विकण्यात आले. आज हीच इमारत जीवघेणी बनली आहे. पण फसवणूक झालेल्या नागरिकांना बिल्डर जुमानत नाही, त्यात स्थानिक पोलीस देखील गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाही. दरम्यान, रहिवाशांनी फसवणूक करणाऱ्या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल करण्याची आणि इमारतीच्या पुनर्बांधणीची मागणी केली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी तरी प्रशासनाकडून या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.