Crime News: माता नव्हे वैरीण! जन्म देताच बाळाला कचऱ्यात फेकलं, अर्भकाला कुत्र्यांनी घेरलं अन् थेट बसखाली...

अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. विशेष म्हणजे, पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्र्यांनी दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला.

जाहिरात
Read Time: 1 min

छत्रपती संभाजीनगर: नवजात बालकाला निर्दयी आईनेच रस्त्यावरील कचऱ्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरातच मुलाला जन्म देऊन निर्दयी आईने रस्त्यावरील कचऱ्यात फेकले. धक्कादायक बाब म्हणजे या बालकाचे कुत्र्याने लचके तोडण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाला सुखरुप पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आलं आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरात पती पासून विभक्त राहणाऱ्या 24 वर्षीय गर्भवती तरुणीने एकटीने बाळाला जन्म दिला. कुटुंबापासून ही बाब लपवण्यासाठी घरातच बाळाची नाळ कापून जन्मानंतर अवघ्या दोन तासात गोणीत गुंडाळून रस्त्यावरील कचऱ्यात फेकून दिले. विशेष म्हणजे, पहाटेच्या थंडीत या गोणीचे कुत्र्यांनी दोनदा लचके तोडण्याचा प्रयत्न केला.

Sangamner News: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, हल्लेखोर कोण?

यात ही गोणी एकदा बसखालीही आली. तरीही तीनदा संकट ओढावूनही सतर्क नागरिकांमुळे बाळ सुखरूप राहिले. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता पुंडलिकनगर गजानन महाराज मंदिर रस्त्यावर ही हृदयद्रावक घटना उघडकीस आली. पोलिसांनी मिळालेल्या सीसीटीव्हीच्या आधारे त्या महिलेला ताब्यात घेऊन चौकशी करताच तिने क्रूर कृत्याची कबुली दिली. गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.

नक्की वाचा - Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जरांगे पाटलांच्या आंदोलनावर मोठी प्रतिक्रिया