Yogiraj Sadguru Gangagiri Maharaj : दररोज टँकरमधून 1 लाख लिटर आमटी, 800 गावातून भाकरींचा महाप्रसाद, भाविकांची मोठी गर्दी

यंदा मात्र दरवर्षी पेक्षा जास्त भाविकांची गर्दी असल्याचं सांगितलं जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शनिदेवगावात सध्या टँकरमधून एक लाख लिटर आमटीचा पुरवठा करण्यात आला आहे. अक्षरश: हजारो लिटर पाणी नेणाऱ्या टँकरमधून आमटीचा पुरवठा केला जात आहे. वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे योगीराज सदगुरू गंगागिरी महाराज (Yogiraj Sadguru Gangagiri Maharaj) यांचा सप्ताह सुरू आहे. या सप्ताहामध्ये दरवर्षी लाखो भाविक येत असतात.

या लाखो भाविकांना आमटीचा प्रसाद दिला जातो. मात्र हा प्रसाद वाटप करण्यासाठी थेट 12 हजार लिटरचा टँकरच वापरला जातो. दररोज लाखो लिटर आमटी या सप्ताहामध्ये भाविकांसाठी बनवली जाते. ही आमटी 10 टँकरच्या माध्यमातून भाविकांच्या पंगतीमध्ये पोचवली जाते.

नक्की वाचा - August 2025 Festival Calendar List: पुत्रदा एकादशीपासून गणेश चतुर्थीपर्यंत ऑगस्ट महिन्यातील सण-महत्त्वाचे सण

या सप्ताहामध्ये एकूण 20 लाखाहून अधिक भाविक आवर्जून उपस्थिती नोंदवतात. याचं कारण म्हणजे या सप्ताहाची प्रत्येक घराशी जोडली गेलेली नाळ आणि ती जोडण्यासाठी या सप्ताहामध्ये प्रसाद स्वरूपात दिली जाणारी भाकरी ही कडी ठरते. या सप्ताहामध्ये भाकरी बनत नाही तर प्रसाद म्हणून वाटली जाणारी भाकरी ही छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक या तीन जिल्ह्यातील 800 गावातील घरांमधून दररोज बनून येते. सप्ताहस्थळी सुरू असलेल्या हरिनामाच्या वाणीने बनवलेल्या आमटीचे आणि भाविकांनी आणलेल्या भाकरीचे प्रसादात रूपांतर होते. प्रत्येक घरातून येणाऱ्या या अन्नातून 800 गावातील लाखो घरातील भाविकांची या सप्ताहाशी नाळ जोडली गेलेली आहे. 

Advertisement

यंदा मात्र दरवर्षी पेक्षा जास्त भाविकांची गर्दी असल्याचं सांगितलं जात आहे. या वर्षी जगातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून ओळख असलेल्या गंगागिरी महाराजांच्या सप्ताहामध्ये भाविकांचा उपस्थितीचा नवा उच्चांक समोर येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.