
August 2025 Festival Calendar List: ऑगस्ट महिना हा भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्रीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो. या महिन्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचे सण साजरे केले जातात. या महिन्यामध्ये श्रावणी सोमवार (Shravani Somwar), मंगळगौर, नारळी पौर्णिमा, रक्षा बंधन (Raksha Bandhan 2025), कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2025), हरितालिका तृतीया (Haritalika Tritiya 2025) आणि गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2025) यासह प्रमुख धार्मिक सण आणि महत्त्वाचे दिवस येतात. ऑगस्ट महिन्यातील सर्व सण आणि महत्त्वाच्या दिवसांची यादी जाणून घेऊया...
श्रावण महिन्यातील सण आणि महत्त्वाचे दिवस (August 2025 Festival Calendar List In Marathi)
4 ऑगस्ट 2025
दुसरा श्रावणी सोमवार
शिवामूठ : तीळ
5 ऑगस्ट 2025
पुत्रदा एकादशी
8 ऑगस्ट 2025
नारळी पौर्णिमा
9 ऑगस्ट 2025
श्रावण पौर्णिमा / रक्षाबंधन
भाऊबहिणीच्या नात्याचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन यंदा 9 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
(नक्की वाचा: Shravan 2025 Vrat Importance: श्रावणातील शिवपूजनाचे महत्त्व, नक्त व्रत आणि या 2 तिथीला अभिषेक करणे ठरेल फलदायी)
11 ऑगस्ट 2025
तिसरा श्रावणी सोमवार
शिवामूठ : मूग
12 ऑगस्ट 2025
अंगारक संकष्ट चतुर्थी
15 ऑगस्ट 2025
श्रीकृष्ण जयंती /स्वातंत्र्य दिन
श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्रीच्या वेळेस कृष्णजन्म झाला म्हणून हा दिवस कृष्णजयंती, जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी ओळखला जातो. या दिवशी पूजा, उपवास करण्याची परंपरा आहे.
(नक्की वाचा: Shravan 2025 Horoscope:श्रावण महिन्याचे राशीभविष्य! नोकरी, व्यवसाय, आर्थिक जीवन कसे असेल? जाणून घ्या उपाय)
16 ऑगस्ट 2025
गोपाळकाला
श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये एकावर एक मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडून दिवस साजरा केला जातो.
18 ऑगस्ट 2025
चौथा श्रावणी सोमवार
शिवामूठ : जव
22 ऑगस्ट 2025
पोळा / पिठोरी अमावस्या
(नक्की वाचा: Shravan 2025 Wishes In Marathi: भक्तीचा उत्सव फुलला, श्रावण मास आला! श्रावण मासारंभाच्या पाठवा खास शुभेच्छा)
23 ऑगस्ट 2025
श्रावण अमावस्या
26 ऑगस्ट 2025
हरितालिका तृतीया
भाद्रपद शुद्ध तृतीयेचे हरितालिका (Haritalika Tritiya 2025 Vrat) हे व्रत कुमारीकांनी मनासारखा पती मिळावा यासाठी तसेच सौभाग्यवतींनी पतीला निरोगी आणि दीर्घायुष्य मिळावे म्हणून करतात. हरितालिका (Haritalika Tritiya 2025) हे देवी पार्वतीचेच एक नाव आहे, त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना वर स्वरुपात प्राप्त केले, याचीच आठवण म्हणून हे व्रत केले जाते.
27 ऑगस्ट 2025
श्रीगणेश चतुर्थी
भाद्रपद शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून गणेशोत्सवास शुभारंभ होतो. गणेश चतुर्थीपासून पुढील 10 दिवस घराघरांत, गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाची भाविक मनोभावे सेवा करतात.
28 ऑगस्ट 2025
ऋषिपंचमी
31 ऑगस्ट 2025
ज्येष्ठा गौरी आवाहन
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world