Chhatrapati Udayanraje Bhosale : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटले आहेत. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभर निषेध झाल्यानंतर सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्यांच्या दिलगिरीनंतरही हे प्रकरण शांत झालेलं नाही. शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सोलापूरकरांवर जोरदार टीका केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले उदयनराजे?
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याच्या मलाच नाही तर सर्व शिवभक्तांना वेदना होत आहेत, असं उदयराजे यांनी या विषयावर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, 'हा राहुल सोलापूरकर म्हणजे कोण आहे? तो जे म्हणााला लाच. असे लोकं जे लाच घेतात त्यांना लाचेपलीकडं काही समजत नाही. जीभेला हाड नसतं मला माहिती आहे. उचलली जीभ आणि लावली टाळ्याला... काहीही बोलायचं अशा लोकांच्या जीभा हासडल्याच गेल्या पाहिजेत. जे-जे महापुरुषांबद्दल असे विधान करतात कुणीही असू दे, त्या सगळ्यांना जनतेने ठेचून काढलं पाहिजे. दिसंल तिथं ठेचलं पाहिजे, वेचून ठेचलं पाहिजे.
या विकृतीला वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. आपण याबाबत मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहे, असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरारचे विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा कायदा लावावा अशी मागणी उदयनराजे यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपण जपले नाहीत तर देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
( नक्की वाचा : Pankaja Munde : 'तुम्ही बाहुबली आणि मी शिवगामी....', फडणवीसांसमोर पंकजा मुंडेंची जोरदार फटकेबाजी )
गोळ्या घालून मारा
उदयनराजे पुढं म्हणाले की, अशा लोकांना यापुढं त्यांचे चित्रपट कुठेही असतील ते अभिनय करत असतील ते हाणून पाडलं पाहिजे. चित्रपट क्षेत्रातील निर्माते आणि दिग्दर्शकांनी या लोकांना थारा देऊ नये. या लोकांना गाडलं पाहिजे. या लोकांना गाडलं नाही, या देशाच्या अखंडतेचा प्रश्न आहे. याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. मला जर विचारलं तर मला असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे. त्यालाच नाही तर असे जे-जे लोकं असतील त्या सर्वांना... या शब्दात उदयनराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.