
Pankaja Munde on Devendra Fadnavis : वाल्मीक कराड हत्या प्रकरणामुळे राज्यात बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी या विषयावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसंच परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सुरेश धस तसंच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जोरदार फटकेबाजी केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुम्ही बाहुबली आणि मी शिवगामी!
देवेंद्र फडणवीस बाहुबली असल्याची घोषणाबाजी या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. तोच धागा पकडत पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणात फटकेबाजी केली. त्यांनी फडणवीस यांना बाहुबली म्हणत स्वत:ला शिवगामी असल्याचं सांगून टाकलं.
पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, देवेंद्रजी मला एक किस्सा आठवला. मुख्यमंत्री म्हणून ते तुम्हाला बाहुबली म्हणतात. तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहात, नेते आहात. आम्ही ज्या कॅबिनेटमध्ये काम करतो त्याचे प्रमुख आहात. तुमच्याविषयी आदरभावच नेहमी येतो. आज ममत्वभाव येत आहे. ते तुम्हाला बाहुबली म्हणत होते काही वर्षांपूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते. शिवगामिनी बाहुबलीची आई आहे. त्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला.
( नक्की वाचा : वर्षा बंगल्यावर अजून राहायला का गेले नाहीत? मुख्यमंत्री फडणवीस यांनी अखेर दिलं उत्तर )
शिवगामीचं वाक्य असतं, 'मेरा वचन ही है मेरा शासन जे जाहीर वचन सुरेश धस यांना मी दिलंय तेच माझं शासन आहे. मी गोपीनाथ मुंडेंची लेक आहे, बोलणे एक आणि करणे एक माझ्या रक्तात नाही. असं त्यांनी यावेळी सांगितलं.
सुरेश धस यांनी गेल्या महिनाभरात घेतलेल्या भूमिकेमुळे पंकजा मुंडे या कार्यक्रमाला येणार की नाही? याबाबत चर्चा सुरु होती. पण पंकजा यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहत सर्व उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम दिला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world