Chhattisgarh Accident: छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील अतुरगाव येथे मध्य रात्री उशिरा राष्ट्रीय महामार्ग 30 वर एक भीषण रस्ता अपघात घडला.अतिवेगाने असलेल्या स्विफ्ट डिझायर कारचे नियंत्रण सुटुन ती अनियंत्रित झाल्याणे ती पुलाच्या रेलिंगला धडकली, अपघात ईतका भीषण होता की धडक होताच कारने पेट घेतला. या अपघातात कारमध्ये प्रवास करणाऱ्या 6 तरुणांपैकी 4 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला, तर 2 तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
Strange Wedding: दोन सख्ख्या भावांनी केलं एकाच मुलीशी लग्न, कारण वाचून डोक्याला माराल हात!
छत्तीसगडमधील कांके जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला आहे. रात्री उशिरा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर कुलगाव जवळ एका वेगवान कारने नियंत्रण गमावले आणि ती पुलावर आदळली. धडकेनंतर कारला आग लागली. ज्यामुळे गाडीमधून बाहेर पडता न आल्याने चार युवकांचा जळून मृत्यू झाले. या कारमध्ये एकूण सहा जण होते, त्यापैकी 4 तरुणांचा मृत्यू झाला. जखमी दोघांना कांकेर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सर्व तरुण मुरवेंदहून कांकेरला जात होते. कांकेरमधील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 30 वर केशकलहून परतणारी डिझायर कार शनिवारी रात्री १:३० वाजता अतूर गावाजवळील पुलावर आदळली. धडक इतकी जोरदार होती की कारला आग लागली.
अपघाताच्या वेळी धोंड्रा पाल गावातील पाच मित्र आणि कांकेरचा एक मित्र कारमध्ये होते. आगीत चार तरुण जिवंत जळाले, तर दोन जण कारमधून पडून वाचले अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. फॉरेन्सिक टीमच्या मदतीने कारमधील जळालेले मृतदेह बाहेर काढले जातील.
( नक्की वाचा : आशिया खंडातील 'या' देशात मिळतात Rental Wife! कसा असतो करार? काय असतात अटी? )