मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड

वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली होती. त्यात उदय सामंत यांनी हा प्रस्ताव मांडला होता.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली असून त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली.  त्यात उदय सामंत यांनी प्रस्ताव मांडला होता. आता सत्ता स्थापने संदर्भातले सगळे अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बहाल करण्यात आले आहेत.  

एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधीमंडळ पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवाय सत्तास्थापने बाबतचे सर्व अधिकार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. शिवाय कोणाला मंत्री करायचे याचे अधिकारही त्यांना देण्यात आले आहे. शिवसेनेच्या आमदारांची बैठक ताज हॉटेलमध्ये झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.