- बीड के धारूर तालुका के धुनकवाड गांव के बच्चों के लिए स्कूल जाना खतरे से कम नहीं है.
- बरसात के समय स्कूल तक पहुंचना बच्चों के लिए लगभग असंभव हो जाता है. कच्चे रास्तों में पानी भर जाता.
- बच्चे जान को जोखिम में डालकर खतरनाक रास्ते से होकर स्कूल जाने के लिए मजबूर हैं.
आकाश सावंत, बीड
Beed News : बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. धारूर तालुक्यातील धुनकवाड गावातील लहान मुलांना आपला जीव धोक्यात घालून शाळेत जावे लागत आहे. चिमुकल्यांचा शाळेचा प्रवास आजही धोक्याचा असून ओढ्यातील गुडघाभर पाण्यातून आणि दाट झाडीतून वाट काढत विद्यार्थी दररोज शाळेच्या दिशेने पायपीट करत आहेत. पावसाळ्यात तर ओढ्याला पूर येतो आणि शिक्षणाचा मार्गच बंद होतो.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लहान मुले घनदाट जंगलातून शाळेत जात आहेत आणि पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्णपणे भरले आहेत. मुलांना पाण्यातून वाट काढत जावे लागत आहे. धुनकवाड गावातील ही परिस्थिती गावातील प्रशासकीय उदासीनतेचे आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचे भीषण वास्तव आहे. गावात पक्का रस्ता किंवा पूल नसल्यामुळे मुलांना दररोज या जीवघेण्या परिस्थितीतून जावे लागते.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात येथे पूर येतो आणि शाळेपर्यंत पोहोचणे अशक्य होऊन बसते. यामुळे मुलांच्या शिक्षणात मोठा अडथळा येत आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे मुलांचे शिक्षण थांबण्याची भीती गावकऱ्यांना वाटत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गावकऱ्यांनी कायमस्वरूपी पूल आणि चांगल्या रस्त्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, जर वेळेत यावर काही उपाययोजना केली नाही, तर येत्या काळात या मुलांचे शिक्षण पूर्णपणे थांबू शकते.