गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मुंबईसह उपनगरात गणेश आगमनाची लगबग सुरू आहे. आज परळ वर्क शॉपमधून चिंचपोकळीचा चिंतामणीच्या मूर्तीचे आगमन झाले. यावेळी मोठी गर्दी झाली आहे. बाप्पाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचं मोहक रुप पाहून भाविकांनी अक्षरश: हात जोडून बाप्पाला नमन केलं. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा 106 वे वर्ष आहे. 1920 साली या गणपती मंडळाची स्थापना झाली. आगमनाधीश बाप्पा म्हणून या मंडळाची ख्याती आहे.
22 फुटाची ही मूर्ती पाहण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी केली आहे. आज 17 ऑगस्टपासून चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्याची परवानगी दिली जाईल. सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळपासून 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार आहे.