मुंबई: केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याची आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाशिवरात्रीनिमित्त संत मुक्ताईच्या यात्रेमध्ये रक्षा खडसे यांची मुलगी गेली होती, त्यावेळी काही टवाळखोरांनी तिची छेड काढल्याची घटना घडली. या प्रकाराने राज्यात संतापाची लाट उसळली असून केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीही सुरक्षित नसतील, तर सामन्यांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या अत्याचाराच्या घटनेनंतर रक्षा खडसे यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत छेड काढणाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच ठाण मांडून बसणार अशी भूमिका घेतली. अशातच या घटनेबाबत आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यांनी अतिशय घाणेरडे काम केलं आहे, असे म्हणत या घटनेत काही पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
नक्की वाचा - Shocking Video : थोपाडीत मारलं, पायाला चावली...केस ओढले; प्रॉपर्टीसाठी लेकीकडून आईचा अनन्वित छळ
दुर्दैवाने यात काही विशिष्ट राजकीय पक्षांचे पदाधिकारी आहेत. त्यांनी अतिशय घाणेरडे काम केलं आहे. पोलिसाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे काही जणांना अटक केली आहे. उर्वरित लोकांना ही अटक होईल. परंतु त्यांनी अतिशय चुकीचं काम केलं आहे. त्यांना अजिबात माफी देता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होईल, असे मुख्यमंत्री म्हणालेत. त्यामुळे हे राजकीय टवाळखोर नेमके कोणत्या पक्षाचे आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, या घटनेवरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही संताप व्यक्त केला आहे. "केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची टवाळखोरांनी छेड काढली आणि सुरक्षारक्षकांना धक्काबुक्की केल्याची घटना अत्यंत चिंताजनक असून राज्यात महिला मुली सुरक्षित नाहीत हे दर्शवणारे आहे. गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकरांची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा.." असे हर्षवर्धन सपकाळ म्हणालेत.